संरक्षण मंत्रालय

आसियान देशांमध्ये परदेशातील तैनातीच्या मोहिमेचा भाग म्हणून आय सी जी समुद्र पहारेदार हे जहाज फिलिपाइन्स मध्ये मनिला बे येथे दाखल

Posted On: 26 MAR 2024 9:11AM by PIB Mumbai

भारतीय तटरक्षक दलाचे समुद्र पहारेदार हे विशेष प्रदूषण नियंत्रण जहाज 25 मार्च 2024 रोजी फिलिपाइन्स मध्ये मनिला बे येथे तीन दिवसांच्या भेटीसाठी दाखल झाले. या विशेष प्रदूषण नियंत्रण जहाजाचे मनिला येथील आगमन म्हणजे भारतीय तटरक्षक दलाच्या प्रदूषण प्रतिसाद क्षमतेचे प्रदर्शन करण्याच्या व्यापक उद्दिष्टाचा भाग असून आसियान प्रदेशातील सागरी प्रदूषणाला आळा घालण्याच्या संकल्पासह फिलीपीन कोस्ट गार्ड (PCG) बरोबर द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्याचा देखील यामागे उद्देश आहे. भारतीय तटरक्षक दलाचे हे जहाज 25 मार्च ते 12 एप्रिल 2024 या कालावधीत आसियान देशांमध्ये फिलीपिन्स, व्हिएतनाम आणि ब्रुनेई येथे परदेशात तैनात आहे. आसियान देशांमधील परदेशातील तैनातीचा भाग म्हणून सलग तिसऱ्यांदा भारतीय तटरक्षक दलाने आपले जहाज पाठवले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून 2023 च्या सुरुवातीला, आय सी जी प्रदूषण नियंत्रण जहाजांनी कंबोडिया, मलेशिया, सिंगापूर, थायलंड आणि इंडोनेशियाला भेट दिली होती.

या तैनातीदरम्यान हे जहाज मनिला (फिलीपिन्स), हो ची मिन्ह (व्हिएतनाम), आणि मुआरा (ब्रुनेई) या बंदरांना भेट देणार आहे. हे जहाज विशेष सागरी प्रदूषण नियंत्रण उपकरणांनी सज्ज असून समुद्रात सांडलेले तेल पुन्हा प्राप्त करण्यासाठी आणि आणि ऑपरेशनची एकंदर व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने त्याची रचना करण्यात आली आहे. हे जहाज बंदरांना भेट देतेवेळी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रदूषण प्रतिसाद प्रशिक्षण आणि विविध उपकरणांचे प्रत्यक्ष प्रदर्शन करणार आहे.

याव्यतिरिक्त, या जहाजावर सरकारच्या "पुनीत सागर अभियान" या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आणि भागीदार राष्ट्रांशी समन्वय साधून त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी. राष्ट्रीय छत्रसेनेतील (एनसीसी ) 25  छात्रसैनिक देखील सहभागी झाले आहेत. परदेशी विनिमय कार्यक्रमाचा भाग म्हणून,आयसीजी  जहाजातील कर्मचारी, भागीदार एजन्सी कर्मचारी, भारतीय दूतावास/मोहिमांमधील कर्मचारी आणि स्थानिक युवा संघटना यांच्या समन्वयाने एनसीसीचे छात्रसैनिक जहाज बंदरावर लागल्यानंतर समुद्रकिनारा स्वच्छता आणि तत्सम उपक्रम हाती घेतील.

फिलीपीन तटरक्षक, व्हिएतनाम तटरक्षक आणि ब्रुनेई सागरी संस्था यांसारख्या प्रमुख सागरी संस्थांसोबत द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी या जहाजाचा दौरा महत्वपूर्ण आहे . सागरी सहकार्य आणि सागरी संरक्षण आणि सुरक्षा वाढवण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाचा  फिलिपिन्स आणि व्हिएतनामच्या तटरक्षक दलांसोबत सामंजस्य करार आहे. या प्रदेशातील सुरक्षितता, सुरक्षा आणि सागरी पर्यावरणाच्या समस्या सोडवणे सुनिश्चित करण्यासाठी हे संबंध वर्षानुवर्षांपासून विकसित झाले आहेत. व्यावसायिक देवाणघेवाण, क्रॉस-डेक भेटी म्हणजेच एका जहाजातून दुसऱ्या जहाजात कर्मचारी आणि सामानाचे हस्तांतरण , संयुक्त सराव, तसेच क्षमता-बांधणी सुविधांसह  आणि सामाजिक उपक्रमांचा या जहाजाच्या दौऱ्यामध्ये समावेश आहे.

आयसीजीएस अर्थात भारतीय तटरक्षक दलाच्या समुद्र पहारेदार जहाजाबद्दल:

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर भारतीय तटरक्षक दलाचे समुद्र पहारेदार जहाज हे उपमहानिरीक्षक सुधीर रवींद्रन यांच्या नेतृत्वाखाली तैनात आहे . गेल्या काही वर्षांत, समुद्र पहारेदार या जहाजाने  प्रदूषण प्रतिबंध, विशिष्ट आर्थिक क्षेत्र (ईईझेड ) / आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषा (आयएमबीएल वर पाळत ठेवणे, आंतरराष्ट्रीय गुन्हे विरोधी कारवाई आणि सागरी शोध आणि बचाव (एसएआर) यासह विविध तटरक्षक कार्ये यशस्वीपणे हाती घेतली आहेत.

***

JPS/Bhakti/SBC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2016358) Visitor Counter : 84