संरक्षण मंत्रालय
अणुऊर्जेच्या शांततामय वापराबद्दल विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून देशभरात जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेना आणि भारतीय अणुऊर्जा महामंडळ यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी
Posted On:
21 MAR 2024 6:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 21 मार्च 2024
राष्ट्रीय छात्र सेना ( एनसीसी ) आणि भारतीय अणुऊर्जा महामंडळ लि. (एनपीसीआयएल ) यांनी 21 मार्च 2024 रोजी नवी दिल्ली येथे अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापराबाबत जनजागृती करण्याच्या तसेच याबाबत वैज्ञानिक आणि सत्य माहिती पोहोचवण्याच्या उद्देशाने देशभर विविध जागृतीपर कार्यक्रम राबवण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
या उपक्रमासाठी प्रत्यक्ष कार्यस्थळी शिबिरांचे आयोजन करण्यासह इतर उपक्रमांसाठी एनपीसीआयएल, एनसीसीच्या सहकार्याने छात्र सैनिकांना प्रशिक्षण प्रदान करेल. त्याचप्रमाणे या सामंजस्य करारामुळे त्यांना एन पी सी आय एल च्या देशभरातील कार्यालयांना भेट देण्याची अनोखी संधी उपलब्ध होईल आणि अणुऊर्जेच्या शांततामय वापराबद्दल तसेच तांत्रिक आणि तंत्रज्ञान विषयक बाबींचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल.
छात्र सैनिकांच्या क्षितीजाच्या विस्तार करून एक अधिक जागरूक आणि जबाबदार युवावर्ग घडवण्याच्या दृष्टीने हा सामंजस्य करार महत्वपूर्ण असल्याचे एन सी सीच्या महासंचालकांनी सांगितले. 1.5 दशलक्ष एनसीसी कॅडेट्समध्ये जगभरातील तरुणांच्या विचारांवर प्रभाव टाकण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. अणुऊर्जेच्या शांततामय वापराबद्दल हे जनजागृती अभियान यशस्वी करण्यात छात्र मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
S.Kane/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2015967)
Visitor Counter : 111