संरक्षण मंत्रालय
सशस्त्र दल वैद्यकीय सेवांमधील सर्वोत्कृष्ट आणि द्वितीय सर्वोत्कृष्ट कमांड रुग्णालयांना 2022 या वर्षासाठी संरक्षण मंत्री चषक प्रदान
पुणे येथील कमांड हॉस्पिटल (सदर्न कमांड),आणि लखनौ येथील कमांड हॉस्पिटल (सेंट्रल कमांड),यांची अनुक्रमे सर्वोत्कृष्ट आणि द्वितीय सर्वोत्तम कमांड रुग्णालयांचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले
Posted On:
19 MAR 2024 7:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 19 मार्च 2024
सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालक आणि वरिष्ठ कर्नल कमांडंट आर्मी मेडिकल कॉर्प्स लेफ्टनंट जनरल दलजीत सिंग यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे सशस्त्र दल वैद्यकीय सेवांमधील सर्वोत्कृष्ट आणि द्वितीय सर्वोत्कृष्ट कमांड रुग्णालयांना 2022 या वर्षासाठी संरक्षण मंत्री चषक प्रदान करण्यात आले. कमांड हॉस्पिटल (सदर्न कमांड), पुणे आणि कमांड हॉस्पिटल (सेंट्रल कमांड), लखनौ यांना 2022 सालातील अनुक्रमे सर्वोत्कृष्ट आणि द्वितीय सर्वोत्कृष्ट कमांड हॉस्पिटल म्हणून गौरवण्यात आले.
लढाऊ वैद्यकीय सहाय्य ते परिचालन या भूमिकांमध्ये तैनात असलेल्या सैनिकांना अर्धविभागीय, विभागीय आणि तृतीय श्रेणीतील अत्याधुनिक आरोग्यसेवा देत सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेद्वारे दोन्ही रुग्णालयांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल दोन्ही रुग्णालयांचे अभिनंदन करत,सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालकांनी त्यांनी केलेल्या सेवेची प्रशंसा केली.
लेफ्टनंट जनरल दलजीत सिंग यांनी मोहिमेदरम्यान आणि शांततेच्या काळात तसेच मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारणासाठी आवाहन केल्यावर सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांच्या(AFMS) नेहमीच असलेल्या सुसज्जतेवर भर दिला.तसेच व्यावसायिक उत्कृष्टतेसाठी निरंतर प्रयत्न करण्याच्या एएफएमएसच्या दृढ वचनबद्धतेचाही सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालकांनी पुनरुच्चार केला. 2023 पासून आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ-थोरॅसिक सायन्सेस (एआयसीटीएस), पुणे आणि बेस हॉस्प दिल्ली कँट हे देखील या स्पर्धेत सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले.
या पुरस्कार समारंभाला वैद्यकीय सेवा महासंचालक, इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ प्रमुख (Med), उपसंचालक (Org & Per, AFMS), सशस्त्र सेना आरोग्य महासंचालक , वैद्यकीय सेवा दिल्ली मुख्यालयातील वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार उपस्थित होते.
S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2015586)
Visitor Counter : 96