रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
एनएचएआयने ‘तिसऱ्या फेरी’च्या माध्यमातून 16,000 कोटी रुपयांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे इनविट मुद्रीकरण केले पूर्ण
Posted On:
19 MAR 2024 6:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 19 मार्च 2024
एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील, राष्ट्रीय महामार्ग इन्फ्रा ट्रस्ट (इनविट ) या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठीच्या गुंतवणूक ट्रस्टने ‘इनविट' च्या तिसऱ्या फेरी’तून राष्ट्रीय महामार्गांच्या एकूण 889 किलोमीटरच्या टप्प्याच्या विकासासाठी 16,000 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे.एनएचएआयतर्फे हे सर्वात मोठे मुद्रीकरण असून भारतीय रस्ते क्षेत्राच्या इतिहासातील सर्वात मोठ्या व्यवहारांपैकी एक आहे. ‘इनविटच्या तिसऱ्या फेरी’तून आतापर्यंतचे सर्वात मोठे सवलत मूल्य उभारण्यासाठी गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2024 मध्ये स्वीकृती पत्र जारी करण्यात आले होते.
मुद्रीकरणाच्या या तिसऱ्या फेरीत, एनएचआयटीने राष्ट्रीय महामार्गांच्या टप्प्यांच्या अधिग्रहणासाठी 15,625 कोटी रुपयांचे मुलभूत सवलत शुल्क आणि 75 कोटी अतिरिक्त सवलत शुल्क दराने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून 7,272 कोटी रुपयांचे भागभांडवल उभारले असून भारतीय वित्त संघटनांकडून सुमारे 9,000 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. गुंतवणूकदारांनी सध्याच्या 122.86 रुपयांच्या एनएव्ही वर 124.14 रुपये प्रती युनिट या कट ऑफ दराने समभाग खरेदी केले.
मुद्रीकरणाची ही तिसरी फेरी पूर्ण झाल्यानंतर इनविटच्या तिन्ही फेऱ्यांचे एकूण वास्तविक मूल्य 26,125 कोटी रुपये झाले आहे. यामध्ये 20 ते 30 वर्षांसाठीच्या सवलत कालावधीसाठी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील सुमारे 1525 किमी लांबीच्या पंधरा कार्यरत टोल रस्त्यांच्या वैविध्यपूर्ण पोर्टफ़ोलिओचा समावेश आहे.
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2015562)
Visitor Counter : 132