पंतप्रधान कार्यालय
अपहृत बल्गेरियन जहाज “रुएन” च्या सुटकेसंदर्भात भारतीय नौदलाने केलेल्या कारवाईबाबत बल्गेरिया प्रजासत्ताकच्या राष्ट्रपतींना, पंतप्रधानांनी दिला प्रतिसाद
Posted On:
19 MAR 2024 10:33AM by PIB Mumbai
भारतीय नौदलाने अपहृत बल्गेरियन जहाज “रुएन” आणि त्याच्या चालकासह यातील 7 बल्गेरियन नागरिकांची सुटका केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बल्गेरिया प्रजासत्ताकचे राष्ट्रपती श्री रुमेन रादेव यांना प्रतिसाद दिला आहे. हिंद महासागर क्षेत्रातील जलवाहतुकीच्या स्वातंत्र्याचे संरक्षण आणि चाचेगिरी आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे यावर भर देत पंतप्रधानांनी याबाबत समाधान व्यक्त केलं आहे.
आपल्या X पोस्टवर पंतप्रधानांनी म्हटले आहे,:
“बल्गेरिया प्रजासत्ताक राष्ट्राध्यक्ष आपल्या संदेशाचे स्वागत आहे. 7 बल्गेरियन नागरिक सुरक्षित आहेत आणि लवकरच मायदेशी परतणार आहेत,यांचा आम्हाला आनंद होत आहे. भारत हिंद महासागरातील नौकानयन स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी तसेच चाचेगिरी आणि दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी वचनबद्ध आहे".
***
NM/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2015492)
Visitor Counter : 123
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam