संरक्षण मंत्रालय

भारत- अमेरिका यांच्या टायगर विजय-24 या मदत आणि आपत्ती निवारण संयुक्त सरावाला प्रारंभ

Posted On: 18 MAR 2024 6:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 18 मार्च 2024

भारत आणि ,अमेरिका या देशांदरम्यान प्रस्थापित भागीदारीला अनुसरून, या दोन्ही देशांदरम्यान  18 ते 31 मार्च 24 या कालावधीत पूर्व किनाऱ्यावर टायगर विजय-24 या द्विपक्षीय आणि तिन्ही सेनादलांचा सहभाग असलेल्या मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (एचएडीआर)  या सराव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  भारतीय नौदलाची हेलिकॉप्टर्स आणि लँडिंग विमानांसह सुसज्ज  जहाजे, भारतीय लष्कराचे सैनिक आणि वाहने तसेच भारतीय हवाई दलाची विमाने आणि हेलिकॉप्टर्स यांच्यासह शीघ्र कृती वैदयकीय पथक (आरएएमटी) देखील या सरावात सहभागी होणार आहे. अमेरिकी नौदलाच्या जहाजांवर तैनात अमेरिकी मरीन कोअरची पथके तसेच अमेरिकेच्या लष्करातील सैनिक अमेरिकेतर्फे या सरावात सहभागी होणार आहेत. एचएडीआरविषयक कारवायांच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देशांदरम्यान आंतरपरिचालन क्षमता विकसित करणे तसेच दोन्ही देशांच्या सेनादलांमध्ये जलद आणि विनाअडथळा समन्वय शक्य करण्यासाठी प्रमाणित परिचालन पद्धती (एसओपीज)ला अधिक उत्तम स्वरूप देणे हा या सरावाचा उद्देश आहे.

सरावाचा बंदर परिसरातील टप्पा 18 ते 25 मार्च 2024 या कालावधीत पार पडेल.दोन्ही देशांच्या नौदलांतील कर्मचारी प्रशिक्षणपर भेटी, विषयानुरूप तज्ञांची देवाणघेवाण, क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक परिसंवाद या कार्यक्रमांमध्ये भाग घेतील. बंदराच्या ठिकाणचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर, सेनादलांची पथके तैनात करून ही जहाजे समुद्रातील टप्पा पूर्ण करण्यासाठी निघतील आणि तेथील परिस्थितीनुसार सागरी, जमिनीवरील तसेच समुद्रातील अशा दोन्ही प्रकारची आणि मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) कार्ये  हाती घेतील.

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2015423) Visitor Counter : 98