रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्य प्रदेशच्या उज्जैन जिल्ह्यातील उज्जैन जंक्शन रेल्वे स्थानक आणि महाकालेश्वर मंदिरादरम्यानच्या विद्यमान रोपवेच्या विकास, कार्यान्वयन आणि देखभालीसाठी 188.95 कोटी रुपयांच्या निधीला दिली मंजुरी
प्रविष्टि तिथि:
15 MAR 2024 2:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मार्च 2024
मध्य प्रदेशच्या उज्जैन जिल्ह्यातील उज्जैन जंक्शन रेल्वे स्थानक आणि महाकालेश्वर मंदिरादरम्यानच्या सध्याच्या रोपवेच्या विकास, कार्यान्वयन आणि देखभालीसाठी हायब्रिड ऍन्युइटी माध्यमांतर्गत 188.95 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकारी यांनी एका समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली आहे.
प्रस्तावित रोपवेमुळे विशेषतः तीर्थयात्रेच्या गर्दीच्या काळात भाविकांचा प्रवास सुलभ होईल आणि प्रवासाचा वेळ 7 मिनिटांनी कमी होईल, असे ते म्हणाले. रोपवेच्या माध्यमातून दररोज 64,000 यात्रेकरूंना प्रवास करता येईल. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत असताना वाहतुकीची पर्यावरणपूरक साधने उपलब्ध होतील असे गडकरी म्हणाले.
* * *
S.Kane/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2014893)
आगंतुक पटल : 113