रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आसाममधील धुबरी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग- 17 (नवीन)/ राष्ट्रीय महामार्ग- 31 (जुना) सह गौरीपूर बाह्यवळण मार्गाच्या 4 पदरीकरणासाठी नितीन गडकरी यांनी 421.15 कोटी रुपये केले मंजूर

Posted On: 15 MAR 2024 11:31AM by PIB Mumbai

आसाममधील धुबरी जिल्ह्यातल्या

दुमरदोहा पीटी-II -ते बलदमारा या अंतरामधे राष्ट्रीय महामार्ग-17 (नवीन)/ राष्ट्रीय महामार्ग- 31(जुना) वर गौरीपूर बाह्यवळण मार्गाच्या चौपरीकरणासाठी 421.15 कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका समाज माध्यम संदेशात ही माहिती दिली आहे.

📢 Assam 🛣

➡ In Assam, an allocation of ₹421.15 Crores has been approved for the construction of a 4-lane Gauripur Bypass along NH-17 (New)/NH-31(Old), spanning from Dumardoha Pt-II to the Baladmara road in Dhubri district.

➡ Covering a total length of 9.61 kilometers, the…

— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) March 14, 2024

गौरीपूर शहरातील वाहतूककोंडी कमी करणे आणि या महामार्गावरील तीव्र वळणांशी संबंधित जोखीम कमी करुन सुरक्षितता वाढवणे हा या एकूण 9.61 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचा उद्देश आहे. सर्वसमावेशक रस्ते सुरक्षा उपाययोजनांनी सुसज्ज असलेल्या या बाह्यवळण मार्गाच्या अंमलबजावणीमुळे या प्रदेशातील अपघात कमी होण्यास लक्षणीय योगदान मिळण्याची अपेक्षा आहे असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

***

NM/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2014876)