कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
ए एस राजीव यांची केंद्रीय दक्षता आयोगावर दक्षता आयुक्त म्हणून नेमणूक
प्रविष्टि तिथि:
11 MAR 2024 9:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मार्च 2024
केंद्रीय दक्षता आयोग कायदा 2003 च्या कलम 4 (1) अन्वये निहीत अधिकारानुसार राष्ट्रपतींनी केंद्रीय दक्षता आयोगात ए एस राजीव यांची नेमणूक दक्षता आयुक्त म्हणून केली आहे.
केंद्रीय दक्षता आयोग कायदा 2003 च्या 5(3) मधील तरतुदीनुसार राष्ट्रपतींनी अधिकार दिलेल्या मुख्य दक्षता आयुक्तांसमोर ए एस राजीव यांनी 11 मार्च 2024 रोजी शपथ घेतली. दक्षता आयुक्त अरविंद कुमार यावेळी उपस्थित होते.

ए एस राजीव हे पेशाने बँकर असून, सिंडिकेट बँक इंडियन बँक, विजया बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र अशा चार बँकांमधला एकूण 38 वर्षाचा अनुभव त्यांना आहे. इंडियन बँकेमध्ये कार्यकारी संचालक म्हणून त्यांच्या कार्यकाळात, सर्वात कमी थकित कर्जे आणि सर्वाधिक भांडवली पर्याप्तता गुणोत्तरासह इंडियन बँक भारतातील सर्वात मजबूत आणि सर्वात फायदेशीर बँकांपैकी एक म्हणून उदयास आली.
गेल्या 5 वर्षांपासून ते बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असताना भारतीय रिझर्व बॅंकेच्या तत्काळ सुधारात्मक प्रक्रियेतून बँक ऑफ महाराष्ट्र यशस्वीपणे पार झाली. लहान म्हणून गणल्या जाणाऱ्या बँकेपासून मजबूत मध्यम बँक म्हणून बँकिंगच्या पुढील कक्षेत तिचा प्रवेश झाला. प्रभावीपणे बँकेचे नेतृत्व करत त्यांनी .सर्व प्रमुख व्यवसाय आणि नफा निकषांच्या संदर्भात सर्वोत्तम मालमत्ता दर्जा असलेली आणि देशातील सर्वोच्च कामगिरी करणारी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणून महाराष्ट्र बँकेचे स्थान निश्चित केले.

एक्झिम बँक, न्यू इंडिया अँश्युरन्स कंपनी लिमिटेड आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) मध्ये निर्देशित संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ते भारतीय बँक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष होते तसेच भारतीय लेखा मानकांच्या अंमलबजावणीसाठी भारतीय रिझर्व बँकेने स्थापन केलेल्या कोअर ग्रुपचे सदस्य देखील होते.या शपथविधी सोहळ्याला कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (डीओपीटी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सी. बी. आय.), अंमलबजावणी संचालनालय (ई. डी.) आणि केंद्रीय दक्षता आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय दक्षता आयोग कायदा, 2003 मध्ये मुख्य दक्षता आयुक्त आणि दोन दक्षता आयुक्तांच्या नियुक्तीची तरतूद आहे. दक्षता आयुक्तांचा कार्यकाळ चार वर्षे किंवा नियुक्त अधिकाऱ्याचे वय 65 वर्षे होईपर्यंत असतो.
* * *
S.Patil/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2013600)
आगंतुक पटल : 521