रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कर्नाटकातील म्हैसूर येथे 4000 कोटी रुपयांच्या 268 किलोमीटर लांबीच्या 22 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली.

Posted On: 10 MAR 2024 3:16PM by PIB Mumbai

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कर्नाटकात म्हैसूर येथे आज 268 किलोमीटर लांबीच्या आणि 4000 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या 22 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली.

विशेष म्हणजे हुल्लीयार - के बी क्रॉस - चुंचनहल्ली - नेल्लीगेरे मार्ग यासारख्या मार्गांमुळे म्हैसूर आणि उत्तर कर्नाटकामधील वाहतूक सुविधा अजून वाढेल . म्हैसूर रिंग रोड हा सर्विस रोड आणि RUBS सह पूर्ण होणारा प्रकल्प शहरातील वाहतुकीची गर्दी कमी करेल आणि सुरळीत वाहतूकीची हमी देईल. 

बेळूर-हसन आणि येडगौडानहळ्ळी बिळीकेरे रस्त्याचे चौपदरीकरण तसेच हंगरहळ्ळी आणि होलेनरसीपुर बायपास मार्गे प्रवासाच्या वेळेत दोन तासाची बचत करणे हे उद्दिष्ट आहे. 

हुन्सूर शहरातील गर्दी कमी करण्यासाठी लक्ष्मणतीर्थ नदीवरील मुख्य पुलाची उभारणी करणे आवश्यक आहे. यामुळे सुटसुटीत शहर नियोजनाशी बांधिलकी राखली जाईल ‌. याशिवाय श्रीनिवासपुरा आणि चिंतामणी हे दोन्ही बायपास दोन्ही शहरांमध्ये गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

महत्त्वाच्या तसेच काही साधारण पुलांचे धोरणात्मक नियोजन समाविष्ट करणे तसेच रेल्वे लेवल क्रॉसिंग वर रोड ओव्हर ब्रिज असणे हे दिशाहीन वाहतुकीला वळण देण्याच्या दृष्टीने केलेले ठाम प्रयत्न अधोरेखित करतात.

***

NM/VijayaS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2013349) Visitor Counter : 43