सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
डीडी न्यूज, डीडी इंडिया या वाहिन्यांवरील सादरकर्त्यांच्या वेशभूषा सहयोगाचे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अध्यक्षांकडून प्रारंभ
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने डीडी न्यूज आणि डीडी इंडियाच्या सादरकर्त्यांच्या वेशभूषेतील सहयोगाबद्दल प्रसार भारतीशी 18 सप्टेंबर 2023 रोजी केला होता सामंजस्य करार
प्रविष्टि तिथि:
10 MAR 2024 4:53PM by PIB Mumbai
खादी आणि ग्रामोद्योग आयोग ( KVIC) चे अध्यक्ष मनोज कुमार यांनी डीडी न्यूज तसेच इंडिया यांच्या सादरकर्त्यांच्या वेशभूषेतील सहभागाचे प्रसार भारतीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांच्या तसेच दूरदर्शनच्या चमूच्या उपस्थितीत 9 मार्च 2024 रोजी दूरदर्शन भवन, मंडी हाऊस, नवी दिल्ली येथे प्रारंभ झाला.

यावेळी बोलताना KVIC चे अध्यक्ष म्हणाले, ‘नये भारत की नई खादी’ डीडीच्या सर्व सादरकर्त्यांच्या वेशभूषेच्या सहयोगासाठी सज्ज आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक घरामध्ये खादी लोकप्रिय करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा हा एक भाग आहे. देशासाठी खादी, फॅशनसाठी खादी आणि परिवर्तनासाठी खादी हा पंतप्रधानांनी दिलेला मंत्र आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्राने लक्षणीय प्रगती करत 1.34 लाख कोटींहून अधिक उलाढाल केली आणि 9.50 लाख नवीन रोजगार निर्माण केले, हे सरकारच्या खादी कारागीरांच्या कल्याणाप्रति असलेल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे असे कुमार यांनी अधोरेखित केले.


डीडी इंडिया वरील अँकर्सच्या वेशभूषेच्या माध्यमातून खादी आणि ग्रामोद्योग आयोगाबरोबरचा सहयोग जगाच्या नजरेसमोर येणे हा दूरदर्शनसाठी महत्त्वाचा तसेच अभिमानाचा क्षण आहे असे प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी यावेळी नमूद केले.
***
NM/VijayaS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2013342)
आगंतुक पटल : 129