अर्थ मंत्रालय
आर्थिक वर्ष 2023-24 साठी आगाऊ कर ई-मोहिमेच्या व्याप्तीसाठी प्राप्तीकर विभाग ई-मोहिम सुरु करणार
व्यक्ती/संस्था यांनी केलेल्या विशिष्ट आर्थिक व्यवहारांबद्दल ई-मोहिमेच्या माध्यमातून ई मेल/एस एम एस द्वारे त्यांचा देय असलेला आगाऊ कर 15.03.2024 किंवा त्याआधी भरण्याचे सूचित केले जाईल
Posted On:
10 MAR 2024 12:47PM by PIB Mumbai
आर्थिक वर्ष (F.Y.) 2023-24 दरम्यान प्राप्तीकर विभागाला काही व्यक्ती/संस्था यांनी केलेल्या विशिष्ट आर्थिक व्यवहारांबद्दल माहिती प्राप्त झाली आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत भरलेल्या करांच्या विश्लेषणाच्या आधारावर, विभागाला अशा व्यक्ती/संस्थांची ओळख पटली आहे ज्यांनी आर्थिक वर्ष 2023-24 (कर निर्धारण वर्ष 2024-25) साठी भरणा केलेले कर संबंधित कालावधीत केलेल्या आर्थिक व्यवहारांशी सुसंगत नाहीत.
त्यामुळे, करदात्याच्या सेवा उपक्रमाचा एक भाग म्हणून प्राप्तीकर विभागाने एक ई-मोहिम हाती घेतली आहे. यामागचा उद्देश अशा व्यक्ती/संस्थांना ई मेलद्वारे महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहारांची माहिती देता येणार आहे (कर निर्धारण वर्ष 2024-25 साठी आगाऊ कर ई-मोहिम-महत्वाचे व्यवहार म्हणून चिन्हांकित करून) तसेच एसएमएस करून त्यांना त्यांच्या आगाऊ कर दायित्वाची अचूक गणना करण्यास आणि 15.03.2024 रोजी किंवा त्यापूर्वी देय आगाऊ कर जमा करण्यास उद्युक्त केले जाणार आहे.
प्राप्तीकर विभागाला करदात्यांच्या विशिष्ट आर्थिक व्यवहारांची माहिती विविध स्त्रोतांकडून प्राप्त होत असते. पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि ऐच्छिक कर पूर्ततेला प्रोत्साहन देण्यासाठी ही माहिती वार्षिक माहिती निवेदनाद्वारे (AIS) जाहीरव केली जाते आणि ती व्यक्ती/संस्था यांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात येते. हे विश्लेषण करण्यासाठी AIS मधील ‘महत्त्वपूर्ण व्यवहार’ या स्वरुपात दर्शवण्यात येते.
महत्त्वपूर्ण व्यवहारांचे तपशील पाहण्यासाठी, व्यक्ती/संस्था त्यांच्या ई-फायलिंग खात्यावर लॉग इन करू शकतात (आधीच तयार असल्यास) आणि अनुपालन पोर्टलवर याची पूर्तता करू शकतात. या पोर्टलवर महत्त्वपूर्ण व्यवहार पाहण्यासाठी ई-कॅम्पेन टॅबद्वारे प्रवेश करता येऊ शकतो.
ज्या व्यक्ती/संस्था ई-फायलिंग संकेतस्थळावर नोंदणीकृत नाहीत त्यांना प्रथम ई-फायलिंग संकेतस्थळावर स्वतःची नोंदणी करावी लागते. नोंदणीकरिता ई-फायलिंग संकेतस्थळावरील ‘नोंदणी’ बटण दाबत त्यामध्ये संबंधित तपशील प्रदान केला जाऊ शकतो. यशस्वी नोंदणीनंतर, ई-फायलिंग खात्यात लॉग इन केले जाऊ शकते आणि ई-मोहीम टॅबच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण व्यवहार पाहण्यासाठी पूर्तता पोर्टलवर प्रवेश केला जाऊ शकतो.
करदात्यांना पूर्तता सुलभ करण्यासाठी आणि करदात्यांच्या सेवा वाढवण्याची त्यांची वचनबद्धता बळकट करण्यासाठी प्राप्तीकर विभागाचा हा आणखी एक उपक्रम आहे.
***
G.Chippalkatti/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2013190)
Visitor Counter : 151