गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

मोदी सरकारने, अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड मोहम्मद कासिम गुज्जर उर्फ सलमान उर्फ सुलेमान याला दहशतवादी म्हणून केले घोषित

Posted On: 07 MAR 2024 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 मार्च 2024

 

मोदी सरकारने अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड मोहम्मद कासिम गुज्जर  उर्फ सलमान उर्फ सुलेमान याला  दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.

गृहमंत्र्यांच्या कार्यालयाने X या समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मोदी सरकारने, अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड मोहम्मद कासिम गुज्जर उर्फ सलमान उर्फ सुलेमान याला  दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.  लष्कर-ए तैयबा (LeT) या दहशतवादी संघटनेचा सक्रीय सदस्य असलेला मोहम्मद कासिम गुज्जर अनेक दहशतवादी हल्ल्यांमधील असंख्य मृत्यू आणि अनेक जण जखमी होण्यास जबाबदार आहे. भारताविरूद्ध युद्धाच्या नियोजनात देखील त्याचा सहभाग आहे.  देशाची एकता आणि अखंडता भंग करणारे कृत्य करताना कुणीही आढळल्यास त्याच्याविरुद्ध  अत्यंत कठोर कारवाई केली जाईल.”

 

* * *

S.Kane/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2012329) Visitor Counter : 88