पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 च्या कलम 49 एम अंतर्गत तयार केलेल्या नियमांची अधिसूचना (2022 मध्ये सुधारणा केल्याप्रमाणे)

Posted On: 06 MAR 2024 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 मार्च 2024 

 

वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 (1972 चा 53) वन्य प्राण्यांच्या विविध प्रजातींचे संरक्षण, त्यांच्या अधिवासाचे व्यवस्थापन आणि वन्य प्राण्यांच्या विविध भागांमधून मिळणाऱ्या उत्पादनांच्या व्यापाराचे नियमन आणि नियंत्रण यासाठी कायदेशीर चौकट प्रदान करतो.

या कायद्यात शेवटची सुधारणा 2022 मध्ये करण्यात आली होती. वन्यजीव (संरक्षण) सुधारणा कायदा, 2022, 1 एप्रिल 2023 पासून लागू झाला आहे. या कायद्याच्या कलम 49 एम मध्ये सीआयटीईएस च्या परिशिष्टांमध्ये सूचीबद्ध आणि वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 च्या अनुसूची 4 मध्ये सूचीबद्ध असलेल्या जिवंत प्राण्यांच्या प्रजातींचा ताबा, हस्तांतरण आणि जन्म तसेच मृत्यूची नोंद करण्याची तरतूद आहे.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने 28 फेब्रुवारी 2024 रोजी राजपत्र अधिसूचनाद्वारे कलम 49 एमच्या उद्देशांसाठी नियम अधिसूचित केले आहेत.

ज्यांच्याकडे अशा प्राण्यांच्या जिवंत प्रजाती आहेत त्या सर्व व्यक्तींनी हे नियम सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या कालावधीत आणि त्यानंतर अशा प्राण्यांच्या प्रजाती ताब्यात घेतल्यानंतर तीस दिवसांच्या आत संबंधित राज्य मुख्य वन्यजीव अधिकाऱ्याकडे परीवेश 2 पोर्टलद्वारे (https://parivesh.nic.in/ parivesh-ua #/) अशा मालकीच्या नोंदणीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

अशा प्राण्यांचा ताबा आणि त्यांच्या संततींच्या जन्माचे कोणतेही हस्तांतरण देखील नोंदवले जाईल तसेच अशा प्राण्यांच्या मृत्यू संबंधित माहिती मुख्य वन्यजीव वॉर्डनला या नियमांनुसार  PARIVESH 2 पोर्टलद्वारे कळवली जाईल.

राजपत्र अधिसूचनासाठी येथे क्लिक करावे

 

* * *

S.Bedekar/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2012022) Visitor Counter : 247