संरक्षण मंत्रालय

एनएडी (करंजा) साठी तयार केलेल्या 11 एक्स एसीटीसीएमच्या 5व्या बार्ज 'एम्युनिशन कम टॉरपीडो कम मिसाइल बार्ज, एलएसएएम 19' (यार्ड 129)चे मुंबईमधील डॉकयार्ड मध्ये हस्तांतरण

Posted On: 05 MAR 2024 2:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 मार्च 2024

 

एमएसएमई शिपयार्ड, मेसर्स सूर्यदिप्ता प्रोजेक्ट्स प्राइवेट लिमिटेड,  ठाणे द्वारा भारतीय नौसेना एनएडी (करंजा) साठी तयार केलेल्या 11 एक्स एसीटीसीएमच्या 5व्या बार्ज 'एम्युनिशन कम टॉरपीडो कम मिसाइल बार्ज, एलएसएएम 19' (यार्ड 129)चे 04 मार्च 2024 ला मुंबईमधील डॉकयार्डमध्ये एका कार्यक्रमात हस्तांतरण  करण्यात आले. यावेळी झालेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कँप्टन आशुतोष एचक्यूडब्ल्युएनसी/एसीआरओ होते.

11 एक्स एसीटीसीएम बार्जच्या निर्मितीसाठी 05 मार्च 2021 ला संरक्षण मंत्रालय आणि ठाण्यातील मेसर्स सूर्यदीप्त प्रोजेक्ट्स प्राइवेट लिमिटेड यांच्यात एका करारावर स्वाक्षरी केली गेली होती. या बार्जेसच्या समावेशामुळे जेट्टीच्या बाजूने आणि बाह्य बंदरावर भारतीय नौदलाच्या जहाजांच्या कारवाईला गती मिळेल ज्यामुळे युद्ध साहित्य/दारूगोळा वाहतूक, भरणे आणि उतरवणे इत्यादी सुलभपणे होईल.

या बार्जेसची रचना भारतीय नौदलाच्या संबंधित नियमांनुसार आणि भारतीय शिपिंग रजिस्टरच्या नियमांनुसार स्वदेशी आरेखनानुसार  बांधल्या गेल्या आहेत.  सुरुवातीच्या टप्प्यात विशाखापट्टणम येथे नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेत,  या बार्जच्या मॉडेलची चाचणी घेण्यात आली.  हे बार्ज भारत सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाचे अभिमानास्पद ध्वजवाहक आहेत.

 

* * *

NM/G.Deoda/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2011565) Visitor Counter : 50