आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एकात्मिक आरोग्य संशोधनासाठी एम्समध्ये आयुष-आयसीएमआर अत्याधुनिक केंद्राचा डॉ. मनसुख मांडविया यांनी केला प्रारंभ


पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक वैज्ञानिक संशोधन यांच्यातील अंतर कमी करणारे आणि आरोग्यसेवेसाठी समन्वयवादी दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणारे आयुषमधील सहयोगात्मक संशोधन अत्यंत महत्त्वाचे आहे : डॉ. मनसुख मांडविया

रक्तक्षयावरील उपचारांसाठी बहुकेंद्र क्लिनिकल चाचणीची केली घोषणा

आयुष आरोग्य सुविधांसाठी भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांची केली सुरुवात

Posted On: 04 MAR 2024 4:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 मार्च 2024

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी आज नवी दिल्लीत एम्समध्ये आयुष-आयसीएमआर अत्याधुनिक एकात्मिक आरोग्य संशोधन केंद्राचा आरंभ  केला. यावेळी त्यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि आयुष मंत्रालय यांच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या  अन्य  मोठ्या  संयुक्त उपक्रमांची घोषणा केली यात रक्तक्षयावरील उपचारांसाठी बहुकेंद्र क्लिनिकल चाचणी आणि आयुष आरोग्य सुविधांसाठी भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांची  (आयपीएचएस ) सुरुवात करणे याचा समावेश आहे.  केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यावेळी राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाच्या 27 व्या दीक्षांत समारंभाचे आणि ‘आयुर्वेद अमृतनाम’ या विषयावरील 29 व्या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन केले.

"पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक वैज्ञानिक संशोधन यांच्यातील अंतर कमी करणारे आणि आरोग्य सेवेसाठी समन्वयवादी दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणारे असल्यामुळे आयुषमधील सहयोगी संशोधन हे अत्यंत महत्त्वाचे आहे'', असे डॉ. मनसुख मांडविया यांनी या सहयोगी उपक्रमांच्या शुभारंभप्रसंगी आनंद व्यक्त करताना सांगितले.

  

पार्श्वभूमी

5 एकात्मिक आरोग्य संशोधनासाठी आयुष-आयसीएमआर अत्याधुनिक  केंद्र:

रोगनिदान निदान, प्रतिबंधात्मक उपचार , आरोग्य प्रवर्तक तसेच उपचार पद्धतींशी संबंधित नवोन्मेषाद्वारे .रुग्णांना सुधारित आरोग्य उपचार  देण्याच्या दृष्टीने  एकात्मिक आरोग्य सेवा लोकांपर्यंत पोहोचवणेआयुष-आयसीएमआर अत्याधुनिक  एकात्मिक आरोग्य संशोधन केंद्राची स्थापना पारंपरिक जैव-औषध आणि आधुनिक तंत्रज्ञानासह एकात्मिक आरोग्य संशोधन विकसित करण्यासाठी केली जात आहे. खालील चार एम्समध्ये  ही अत्याधुनिक केंद्र असतील :

एम्स दिल्ली :

  1. जठर आणि  आतड्यांशी संबंधित आजारांवरील एकात्मिक आरोग्य संशोधनासाठी अत्याधुनिक केंद्र
  2. महिला आणि बाल आरोग्यामध्ये एकात्मिक आरोग्य संशोधनासाठी अत्याधुनिक  केंद्र

एम्स  जोधपूर: वृद्धांच्या  आरोग्यासाठी एकात्मिक आरोग्य संशोधनासाठी अत्याधुनिक  केंद्र

एम्स नागपूर: कर्करोग उपचारांसाठी  एकात्मिक आरोग्य संशोधनासाठी अत्याधुनिक  केंद्र

एम्स  ऋषिकेश: वृद्धांच्या  आरोग्यासाठी  एकात्मिक आरोग्य संशोधनासाठी अत्याधुनिक   केंद्र

रक्तक्षयावरील उपचारांसाठी बहुकेंद्र  क्लिनिकल चाचणीची घोषणा:

आयुष मंत्रालयाच्या आणि आयसीएमआर अंतर्गत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने रक्ताक्षयावर '' प्रजनन  वयोगटातील बिगर-गर्भवती महिलांमध्ये मध्यम लोहाच्या कमतरतेच्या रक्ताक्षयाच्या  उपचारांमध्ये   आयर्न फॉलिक ऍसिडच्या तुलनेत एकट्या पुनर्नवादी मंडुराची कार्यक्षमता आणि सुरक्षितता आणि द्राक्षावलेहाचे  संयोजन" हा संशोधन अभ्यास केला आहे. ही  समुदाय-आधारित त्रिस्तरीय बहुकेंद्र  यादृच्छिक नियंत्रित चाचणी असणार आहे. .एमजीआयएमएस वर्धा, केईएम रुग्णालय  संशोधन केंद्रासह  8 वेगवेगळ्या ठिकाणी हा अभ्यास केला जाईल.

आयुष आरोग्य सुविधांसाठी भारतीय सार्वजनिक आरोग्य मानके जारी :

एकसमान मानके आणि दर्जेदार पायाभूत सुविधा,मनुष्यबळ , औषधे इ. आयुष आरोग्य सुविधांसाठी भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांचे उद्दिष्ट आहे. या मानकांचा अवलंब करून, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश योग्य लोकांपर्यंत दर्जेदार आयुष आरोग्य सेवा प्रदान करू शकतील.

यावेळी आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि केंद्रीय आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2011251) Visitor Counter : 92