रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेने फेब्रुवारी 2024 पर्यंत 1434.03 टन मालवाहतूक केली
गेल्या वर्षी याच कालावधीतील मालवाहतुकीशी तुलना करता यावर्षी 66.51 टन अधिक मालवाहतूक झाली
एप्रिल 2023 ते फेब्रुवारी 2024 या काळात रेल्वेने मालवाहतुकीतून 1,55,557.1 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले
मालवाहतुकीतून रेल्वेला मिळालेले हे उत्पन्न गेल्या वर्षी याच कालावधीत मिळालेल्या उत्पन्नाच्या तुलनेत 6,468.17 कोटी रुपयांनी अधिक आहे
फेब्रुवारी 2024 मध्ये रेल्वेने 136.60 टन मालवाहतूक केली – गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत यावर्षी मालवाहतुकीमध्ये 10.13%ची सुधारणा
Posted On:
01 MAR 2024 9:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मार्च 2024
एप्रिल 2023 ते फेब्रुवारी 2024 या काळातील एकत्रित आकडेवारीनुसार, भारतीय रेल्वेने गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 1367.5 टन मालवाहतुकीच्या तुलनेत यावर्षी 1434.01 टन मालवाहतूक केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या मालवाहतुकीच्या तुलनेत यावर्षी अंदाजे 66.51 टन इतकी जास्त मालवाहतूक झाली आहे. भारतीय रेल्वेने यावर्षी मालवाहतुकीतून 155557.1 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले असून, गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या 149088.1 कोटी रुपयांच्या उत्पन्नाच्या तुलनेत यावर्षी रेल्वेच्या उत्पन्नात सुमारे 6468.17 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
भारतीय रेल्वेने फेब्रुवारी 2024 मध्ये वाहतूक सुरु होण्याच्या स्थानकांपासून 136.60 टन मालवाहतूक केली. फेब्रुवारी 2023 मध्ये रेल्वेने 124.03 टन मालवाहतूक केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी रेल्वेच्या मालवाहतुकीमध्ये अंदाजे 10.13% वाढ दिसून आली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये मालवाहतुकी द्वारे रेल्वेला 14931.89 कोटी रुपये इतका महसूल मिळाला आहे. तर फेब्रुवारी 2023 मध्ये रेल्वेला 13700.75 कोटी रुपये इतका महसूल मिळाला होता. यातून गेल्या वर्षीच्या तुलनेत रेल्वेला यावर्षी मिळालेल्या महसुलात 8.98 % इतकी सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे.
फेब्रुवारी 2024 मध्ये भारतीय रेल्वेने 59.08 टन कोळसा, 15.11 टन लोह खनिज, 5.69 टन पिग आयर्न आणि फिनिश्ड स्टील, 7.59 टन सिमेंट (क्लिंकर वगळता), 5.45 टन क्लिंकर, 5.10 टन अन्नधान्य, 3.962 टन खते, 4.06 टन खनिज तेल, कंटेनरच्या स्वरुपात 7.00MT टन आणि उर्वरित वस्तूंच्या स्वरूपात 10.66 टन मालवाहतूक केली.
“हंग्री फॉर कार्गो” हा मंत्र अनुसरत, भारतीय रेल्वेने व्यवसाय करण्यातील सुलभता वाढवण्यासाठी तसेच स्पर्धात्मक दरांमध्ये सेवा वितरणात सुधारणा करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. ग्राहक केंद्रित दृष्टीकोन आणि लवचिक धोरण आखणीचे पाठबळ असलेल्या व्यवसाय विकास केंद्रांचे कार्य यामुळे भारतीय रेल्वेला हे मोठे यश मिळवण्यात मदत झाली.
* * *
S.Patil/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2010794)
Visitor Counter : 106