खाण मंत्रालय
खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते खाण आणि खनिज क्षेत्रातील नवोन्मेषांना निधी देण्यासाठी पाच स्टार्ट-अपना आर्थिक अनुदान पत्रे सुपूर्द
Posted On:
01 MAR 2024 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मार्च 2024
भारत सरकारचे खाण मंत्रालय, त्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान कार्यक्रमांतर्गत (एस अँड टी प्रोग्रॅम) 1978 पासून खाण आणि धातूशास्त्र क्षेत्रातील सुरक्षा, अर्थव्यवस्था, शीघ्रता आणि कार्यक्षमतेसाठी अनेक संशोधन संस्थांच्या संशोधन आणि विकास प्रकल्पांना (आर अँड डी प्रकल्प) अर्थसहाय्य देत आहे.
अलीकडेच, खाण मंत्रालयाने संशोधन आणि विकास आणि व्यावसायिकीकरण यामधील अंतर भरून काढण्यासाठी तसेच खाण आणि खनिज क्षेत्रातील संपूर्ण मूल्य साखळीकरिता परिसंस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी खाण आणि खनिज क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्ट अप आणि एमएसएमई मधील संशोधन आणि नवोन्मेष निधीसाठी नोव्हेंबर 2023 मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान- प्रिज्म (एस अँड टी प्रिज्म) सुरू करून विज्ञान आणि तंत्रज्ञान कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली आहे. एकूण 56 स्टार्ट-अप/एमएसएमई सहभागी झाले होते त्यापैकी त्यांच्या कामगिरीवर आधारित एकूण 6 कोटी रुपयांच्या निधी वाटपासाठी 5 जणांची निवड करण्यात आली. आर्थिक अनुदानासोबतच, या निवडक स्टार्ट-अप/एमएसएमईंना संपूर्ण प्रकल्प कालावधीत अंमलबजावणी करणाऱ्या संस्थे अंतर्गत सुविधा आणि मार्गदर्शन पुरवणाऱ्या चमूद्वारे मार्गदर्शन किंवा समावेशन समर्थन आणि तांत्रिक सल्लागार सहाय्य प्रदान केले जाईल.
खाण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील स्वायत्त संस्था असलेली नागपूरची जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर ही विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रिज्म साठी अंमलबजावणी करणारी संस्था बनली आहे.
29 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्र्यांच्या हस्ते आर्थिक अनुदानाची पत्रे सुपूर्द करण्यात आली. या पाच स्टार्ट-अप आणि एमएसएमईचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
- महाराष्ट्रातील पुण्याच्या मेसर्स अश्विनी रेअर अर्थ प्रा. लि. ला एनडीएफईबी आधारित कायमस्वरूपी चुंबकत्व उपयोगाकरिता कॅल्शियो-थर्मिक रिडक्शन प्रक्रियेद्वारे निओडीमियम - प्रासोडीमियम धातूपासून निओडीमियम - प्रासोडीमियम ऑक्साईड मिळवण्याच्या पथदर्शी संयंत्र स्थापनेसाठी 1.5 कोटी रुपये अनुदान.
- उत्तरप्रदेशातील मेरठ येथील मेसर्स सरू स्मेल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड ला अल्कली धातूंसाठी लिथियम आयन-इलेक्ट्रो फ्यूजन अणुभट्टीसाठी पथदर्शी प्रकल्प उभारण्यासाठी 1.16 कोटी रुपये अनुदान.
- ओदिशातील भुवनेश्वर मधील मे. एलएन इंडटेक सर्व्हिसेस प्रा. लि. ला सोडियम कार्बोनेटचे इलेक्ट्रोलिसिस करून ॲल्युमिना हायड्रेट्सचे कार्यक्षम आणि शाश्वत उत्पादन आणि हायड्रोजन तयार करण्यासाठी 0.40 कोटी रुपये अनुदान.
- ओरिसातील कटक मधील मेसर्स सेलार्क पॉवरटेक प्रा. लि. ला लिथियम-आयन बॅटरी एनोडसाठी उच्च शुद्धता बॅटरी ग्रेड सिलिकॉन सामुग्रीच्या प्रायोगिक तत्त्वावरील उत्पादनासाठी (25 किलो/दिवस) 1.7 कोटी रुपये अनुदान.
- मेघालयातील शिलॉंगमधील मेसर्स कॅलिचे प्रायव्हेट लिमिटेड ला भूगर्भातील दुर्मिळ-मूलद्रव्यांच्या शोधासाठी GARBH नावाच्या सॉफ्टवेअरच्या विकासासाठी 1.2 कोटी रुपये अनुदान.
खाण मंत्रालय विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रिज्म च्या पुढच्या फेरीसाठी 1 मार्च 2024 ते 30 एप्रिल 2024 या कालावधीत प्रस्ताव आमंत्रित करेल.
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2010631)
Visitor Counter : 65