सांस्कृतिक मंत्रालय
परफॉर्मिंग आर्ट्स क्षेत्रातील सहा नामवंत व्यक्तींची अकादमी फेलो (अकादमी रत्न) म्हणून निवड
Posted On:
28 FEB 2024 4:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2024
संगीत, नृत्य आणि नाट्य कलेशी संबंधित संगीत नाटक अकादमी, नवी दिल्लीच्या जनरल कौन्सिलने 21 आणि 22 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत कला क्षेत्रातील सहा (6) नामवंत व्यक्तींची अकादमी फेलो (अकादमी रत्न) म्हणून एकमताने निवड केली. अकादमीची फेलोशिप हा सर्वात प्रतिष्ठित आणि दुर्मिळ सन्मान आहे.जो कोणत्याही वेळी जास्तीत जास्त 40 कलाकारांना दिली जाते.
जनरल कौन्सिलने संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2022 आणि 2023 वर्षांसाठी संगीत, नृत्य, नाट्य, पारंपारिक/लोक/आदिवासी संगीत/नृत्य/नाट्य, कठपुतळी आणि एकूणच योगदान/शिष्यवृत्ती या क्षेत्रातील कलाकारांची निवड केली आहे . अकादमीच्या जनरल कौन्सिलने 2022 आणि 2023 या वर्षांसाठी संगीत नाटक अकादमीच्या 'उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारासाठी' 80 तरुण कलाकारांची देखील निवड केली आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र आणि शाल तसेच 25,000/- रुपये असे आहे. हे पुरस्कार संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षांच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान केले जातील.
1952 पासून अकादमी पुरस्कार प्रदान केले जात आहेत. अकादमी रत्नच्या सन्मानार्थ ताम्रपत्र आणि शाल याव्यतिरिक्त 3, 00, 000/- रुपये दिले जातात. तर अकादमी पुरस्काराचे स्वरूप 1,00,000/- रुपये आहे. संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान केले जातील.
अकादमी रत्न आणि पुरस्कार विजेत्यांच्या यादीसाठी खालील लिंकवर क्लिक करा
* * *
S.Kane/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2009815)
Visitor Counter : 117