इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर उद्या पुण्यात विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी होणार
Posted On:
27 FEB 2024 6:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 27 फेब्रुवारी 2024
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि उद्योजकता तसेच जलशक्ती राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर उद्या पुणे येथे "विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी होणार आहेत. भारतीय युवक, स्टार्टअप्स, उद्योगपती आणि राज्यातील नागरिकांशी ते संवाद साधतील, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2047 पर्यंत भारताला ‘विकसित भारत’ या संकल्पनेच्या दिशेने पुढे नेण्याच्या उद्देशाने ते चर्चा करतील.
5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारत करत असलेल्या उल्लेखनीय वाटचालीमुळे देशातील तरुणांसाठी उपलब्ध होणाऱ्या अभूतपूर्व संधी चंद्रशेखर अधोरेखित करतील.
विकसित भारत संकल्प यात्रा ही एक देशव्यापी मोहीम आहे. ग्रामपंचायती, नगरपंचायती आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व्यापक उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी ही मोहीम राबवली जाते. विविध सरकारी योजनांअंतर्गत पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचणे, या योजनांबद्दल महत्त्वाची माहिती प्रसारित करणे, लाभार्थ्यांशी संवाद वाढवणे आणि संभाव्य लाभार्थींची नावनोंदणी करणे ही या मोहिमेची प्राथमिक उद्दिष्टे आहेत.
या मोहिमेमध्ये केंद्र सरकारची विविध मंत्रालये/विभाग, राज्य सरकारे, केंद्र सरकारच्या संस्था आणि संघटनांचा समावेश असून ही मोहीम व्यापक दृष्टिकोनाचे द्योतक आहे. सर्व हितधारकांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करून त्याद्वारे नागरिकांचे सक्षमीकरण आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करणे हे तिचे मुख्य उद्दिष्ट आहे.
S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2009503)
Visitor Counter : 126