आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक आरोग्य संघटनेच्या डिजिटल आरोग्यावरील जागतिक उपक्रमाच्या सार्वजनिक शुभारंभ कार्यक्रमाला डॉ. मनसुख मांडवीय यांनी केले संबोधित


जीआयडीएच वरील भारताचे जागतिक आरोग्य संघटने सोबतचे सहकार्य म्हणजे डिजिटल आरोग्य परिसंस्थेचे परिवर्तन करण्याच्या आमच्या सामायिक वचनबद्धतेची साक्ष : डॉ. मांडविया

Posted On: 21 FEB 2024 6:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 21 फेब्रुवारी 2024

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या डिजिटल आरोग्यावरील जागतिक उपक्रमाच्या (जीआयडीएच) सार्वजनिक शुभारंभ कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले.

जीआयडीएच हे  जागतिक आरोग्य संघटनेद्वारे व्यवस्थापन केले जाणारे जाळे आहे. सर्व जी-20 देशांनी, आमंत्रित देशांनी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी एकमताने याचा स्वीकार केला आहे. गुजरातच्या गांधीनगर येथे 19 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत याची सुरूवात करण्यात आली होती.

जीआयडीएच संदर्भात  भारताचे जागतिक आरोग्य संघटने सोबतचे सहकार्य हे डिजिटल आरोग्य परिसंस्थेचे परिवर्तन करण्याच्या आमच्या सामायिक वचनबद्धतेचा पुरावा आहे असे यावेळी डॉ मांडविय म्हणाले.

राष्ट्रीय डिजिटल आरोग्य परिवर्तनामध्ये, विशेषतः ग्लोबल साउथमध्ये डिजिटल आरोग्य तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्यास जीआयडीएच सहाय्य करेल.  जीआयडीएचच्या यशासाठी भक्कम प्रादेशिक सहकार्याची देखील आवश्यकता आहे असे डॉ. मांडवीय म्हणाले. डब्ल्यूएचओ-एसईएआरओ च्या (आग्नेय आशिया क्षेत्र) संचालकांना या प्रदेशात जीआयडीएचची अंमलबजावणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जी. आय. डी. एच. ची अंमलबजावणी, प्रगती आणि शाश्वततेसाठी भारताचे अविरत पाठबळ राहिल असा पुनरुच्चार करत, सर्व सदस्य देशांनी जागतिक डिजिटल आरोग्य रुपरेषा मजबूत करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. यामुळे सार्वत्रिक आरोग्य उद्दिष्टपूर्तीची खातरजमा करण्याच्या प्रवासात देशांना सक्षम बनवता येईल असेही ते म्हणाले.

पार्श्वभूमी:

भविष्यातील गुंतवणुकीचा प्रभाव वाढवताना, परस्पर उत्तरदायित्व बळकट करत आणि डिजिटल आरोग्य 2020-2025 वरील जागतिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी एक माध्यम म्हणून काम करत, जागतिक डिजिटल आरोग्यातील नजीकच्या आणि भूतकाळातील लाभ एकत्रित करणे आणि वाढवणे हे जी. आय. डी. एच. चे उद्दिष्ट आहे.

N.Chitale/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2007802) Visitor Counter : 126
Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu