विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयएनवायएएस तर्फे 9 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन


सीएसआयआर-एनआयएससीपीआरच्या संचालकांनी समाज सुधारणेसाठी वैज्ञानिक संवादाच्या गरजेबाबत केली चर्चा

Posted On: 19 FEB 2024 2:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 फेब्रुवारी 2024

 

भारतीय राष्ट्रीय विज्ञान युवा अकादमी (आयएनवायएएस)ने 17 फेब्रुवारी रोजी संस्थेच्या 9 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून सीएसआयआर- राष्ट्रीय वैज्ञानिक संवाद आणि धोरणात्मक संशोधन संस्थेच्या (सीएसआयआर-एनआयएससीपीआर) संचालक प्रा.रंजना अगरवाल उपस्थित होत्या.या प्रसंगी, प्रा.अग्रवाल यांनी अभ्यासपूर्ण भाषण केले आणि सीएसआयआर-एनआयएससीपीआरची महत्वाची उद्दिष्ट्ये आणि उपक्रम यांची चर्चा केली.समाजात वैज्ञानिक प्रवृत्ती रुजवण्यासाठी वैज्ञानिक संवादाचे महत्त्व त्यांनी विषद केले. याप्रसंगी त्यांनी आयएनवायएएसच्या वार्षिकांकाचे देखील अनावरण केले.

आयएनवायएएस ही भारतातील तरुण शास्त्रज्ञांची एकमेव मान्यताप्राप्त अकादमी आहे. विज्ञानविषयक शिक्षणाला प्रोत्साहन देणे तसेच युवा शास्त्रज्ञांमधील परस्पर संबंध वाढवणे या उद्देशाने वर्ष 2014 मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. पाच वर्षांचा चिंतनात्मक आणि वृद्धी कालावधी यशस्वीपणे पूर्ण करून वर्ष 2020 पासून आयएनवायएएस या संस्थेने नव्या स्तरात प्रवेश केला.

सीएसआयआर- राष्ट्रीय वैज्ञानिक संवाद आणि धोरणात्मक संशोधन संस्था (सीएसआयआर-एनआयएससीपीआर) ही केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील सीएसआयआर म्हणजेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळाच्या घटक प्रयोगशाळांपैकी एक आहे. ही संस्था वैज्ञानिक संवाद; एसटीआय केंद्रित पुराव्यावर आधारित धोरणात्मक संशोधन आणि अभ्यास या क्षेत्रांमध्ये विशेष कार्य करते.या संस्थेतर्फे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांवर आधारित विविध जर्नल्स, पुस्तके, मासिके, वृत्तांक आणि अहवाल प्रकाशित करत असते. तसेच ही संस्था वैज्ञानिक संवाद, शास्त्रीय धोरण, नवोन्मेष प्रणाली, विज्ञान- समाज संवाद तसेच विज्ञानविषयक राजकीय धोरणे यांच्या संदर्भात संशोधन देखील करत असते. याविषयी अधिक माहितीसाठी कृपया https://niscpr.res.in/  या संकेतस्थळाला भेट द्या किंवा @CSIR_NIScPR या ट्विटर हँडलवर तसेच CSIR NISCPR-OFFICIAL PAGE या फेसबुक पेजवर तसेच इन्स्टाग्रामवर  csr_niscpr येथे पहा.

 

* * *

S.Tupe/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2007074) Visitor Counter : 117


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu