संरक्षण मंत्रालय

आत्मनिर्भर भारत : सशस्त्र दल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या क्षमतांना चालना देण्यासाठी ‘डीएसी’कडून 84,560 कोटी रुपयांचे भांडवल अधिग्रहण प्रस्ताव मंजूर

Posted On: 16 FEB 2024 7:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 फेब्रुवारी 2024

 

संरक्षण  मंत्री  राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील  ‘डीएसी’ अर्थात संरक्षण अधिग्रहण परिषदेने 84,560 कोटी रुपयांच्या विविध भांडवल अधिग्रहण प्रस्तावांना ‘एओएन’ म्हणजेच ‘आवश्‍यकतेची स्वीकृती’ म्हणून मंजुरी दिली. आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्‍ट साध्‍य करण्‍यासाठी,  16  फेब्रुवारी, 24  रोजी देण्यात आलेल्या मंजुरींमध्ये भारतीय विक्रेत्यांकडून विविध उपकरणे खरेदी करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

‘डीएसी’कडून आयडीडीएम (इंडियन- इंडिजिनीयसली डिझाइन्ड डेव्हलप्ड अँड मॅन्युफॅक्चर्ड) श्रेणीतील संरक्षण सामुग्री खरेदी केली जाणार आहे. यामध्‍ये अॅंटी –टँक  भूकंपीय  सेन्सर निष्क्रिय करण्यासाठी  असलेल्या आधुनिक -  नव्‍या आवृत्तीमधील अँटी-टँक अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्ये असलेल्या यंत्रणेचा समावेश आहे. ही यंत्रणा  रिमोटव्दारे संचलित होवू शकणार आहे. यांत्रिकी सैन्याने दृश्यमान रेषेच्या पलीकडे लक्ष वेधण्यासाठी सामरिक लढाई क्षेत्रात कार्यक्षमता आणि वर्चस्व वाढवण्यासाठी, ‘खरेदी श्रेणी अंतर्गत स्वदेशी श्रेणीतील ‘कॅनिस्टर लाँचड् अँटी-आर्मर लोइटर म्युनिशन सिस्टम’  खरेदी करण्‍यात  येणार आहे.

हवाई संरक्षण प्रणाली मजबूत करण्यासाठी, विशेषत: मंद, लहान पल्ल्‍यावर आणि कमी उंचीवरील  लक्ष्ये शोधण्याची क्षमता असलेल्या यंत्र सामुग्रीची तसेच वेगवेगळ्या लक्ष्यांवर पाळत ठेवणे, शोधणे आणि त्यांचा मागोवा घेणे, यांची भारतीय-आयडीडीएमनुसार  खरेदी केली जाणार आहे. ‘एअर डिफेन्स टॅक्टिकल कंट्रोल रडार’ची खरेदी भारतीय आयडीडीएम  श्रेणी अंतर्गत केली जाणार आहे.

भारतीय नौदलाच्या जहाजांना शत्रूंकडून निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून एक पाऊल पुढे ठेवण्यासाठी, विरोधकांच्या  पाणबुड्यांचा शोध घेण्‍यासाठी एओएन अंतर्गत  (भारतीय) श्रेणीमध्ये कमी फ्रिक्वेन्सी आणि लांब पल्ल्यासाठी विविध खोलीवर काम करण्याची क्षमता असलेल्या ‘ऍक्टिव्ह टॉव्‍हड ॲरे सॉनरची खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. ‘कलवरी श्रेणीतील  पाणबुडीची हल्ला करण्याची क्षमता वाढवण्यासाठी जड वजनाच्या टॉर्पेडोची  खरेदीही एओएन अंतर्गत केली जाणार आहे.

‘डीएसी’ने भारतीय वायुसेनेची परिचालन क्षमता आणि पोहोच वाढवण्यासाठी फ्लाइट रिफ्युलर एअरक्राफ्टच्या खरेदीसाठी मंजुरी देण्‍यात आली आहे.

 

* * *

S.Kane/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2006670) Visitor Counter : 72


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu