संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सरकारी ई-मार्केटप्लेस (जीईएम) वर संरक्षण मंत्रालयाने पार केला खरेदीचा 1 लाख कोटी रुपये एकूण व्यापारी मूल्याचा आकडा 

प्रविष्टि तिथि: 15 FEB 2024 5:48PM by PIB Mumbai

 

संरक्षण मंत्रालयाने सरकारी ई-मार्केटप्लेस च्या 2016 मध्ये झालेल्या स्थापनेपासून खरेदीचा 1 लाख कोटी रुपये  एकूण व्यापारी मूल्याचा आकडा पार करणारे एकमेव मंत्रालय बनून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.

चालू आर्थिक वर्षात, संरक्षण मंत्रालयाने 13.2.2024 पर्यंत जीईएम वर सुमारे 46,000 कोटी रुपये मूल्याची मागणी नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये संरक्षण मंत्रालयाचे मागणी मूल्य 28,732.90 कोटी रुपये होते, तर ते आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 15,091.30 कोटी रुपये होते. गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत साठ टक्क्यांहून अधिक लक्षणीय वाढ म्हणजे संरक्षण मंत्रालयाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा, जीईएम प्लॅटफॉर्मला विविध उपकरणांच्या  खरेदीसाठी स्वीकारण्याप्रति बांधिलकीचा दाखला आहे.

देशभरातील 19,800 हून अधिक संरक्षण खरेदीदारांनी जीईएम वर 5.47 लाख ऑर्डर्स दिल्या आहेत. यापैकी सुमारे 50% ऑर्डर्स या सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना देण्यात आल्या, ज्या सार्वजनिक खरेदी बाजारात जास्तीत जास्त सामाजिक समावेशकतेच्या आणि 'आत्मनिर्भरते' च्या दिशेने भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या मुख्य मूल्याशी सुसंगत आहेत.

हा टप्पा म्हणजे संरक्षण मंत्रालय, सशस्त्र सेना, सार्वजनिक क्षेत्र उपक्रम, संरक्षण उद्योग आणि संशोधन संस्थांच्या सहयोगी प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. हे केवळ जीईएम प्लॅटफॉर्मचे यश नसून राष्ट्रीय संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी आणि भारतासाठी समृद्ध भविष्य सुरक्षित करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या समर्पणाची पुष्टी आहे.

***

S.Kane/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2006424) आगंतुक पटल : 127
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu