पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुबईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी दुबईमध्ये जेबेल अली येथे भारत मार्टची केली पायाभरणी
Posted On:
14 FEB 2024 3:48PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुबईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी दुबईमध्ये जेबेल अली फ्री ट्रेड झोन येथे डीपी वर्ल्डद्वारे बांधल्या जात असलेल्या भारत मार्टची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 14 फेब्रुवारी 2024 रोजी पायाभरणी केली.
भारत मार्ट, जेबेल अली बंदराचे धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचे स्थान आणि लॉजिस्टिकमधील सामर्थ्याचा लाभ घेऊन भारत-यूएई द्विपक्षीय व्यापाराला अधिक चालना देईल, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला.
आखाती, पश्चिम आशियाई, आफ्रिकी देश आणि युरेशियामधील आंतरराष्ट्रीय खरेदीदारांपर्यंत पोहोचण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ प्रदान करून, भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रांच्या निर्यातीला चालना देण्याची महत्वाची भूमिका बजावण्याची क्षमता भारत मार्टमध्ये आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
***
S.Kakade/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2005932)
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam