गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी गुजरात मध्ये अहमदाबाद येथे अहमदाबाद महानगरपालिकेच्या 1950 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे केले उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात मॉडेलच्या रूपाने विकासाच्या नव्या दृष्टीकोनाला आकार दिला, आणि त्या आधारावर देशातील जनतेने पंतप्रधान मोदी यांच्या हाती देशाचे नेतृत्व सोपवले : केंद्रीय मंत्री अमीत शाह
मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात पहिली 5 वर्षे आधीच्या सरकारांच्या उणीवा भरून काढण्यात आणि पुढली 5 वर्षे विकसित भारताचा भक्कम पाया घालण्यात आला, तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर मोदीजी त्याच पायावर भव्य इमारत उभारणार : अमित शाह
अयोध्येतील श्री राम मंदिरात श्री राम लल्ला यांची प्राणप्रतिष्ठा करण्या सारखी अनेक शतके प्रलंबित असलेली कामे पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण केली : अमित शाह
Posted On:
12 FEB 2024 6:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 12 फेब्रुवारी 2024
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गुजरात मध्ये अहमदाबाद येथे अहमदाबाद महानगरपालिकेच्या1950 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे उद्घाटन केले.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात मॉडेलच्या रूपाने विकासाच्या एका नव्या दृष्टीकोनाला आकार दिला, आणि त्या आधारावर देशातील जनतेने त्यांच्या हाती देशाचे नेतृत्व सोपवले.ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षात संपूर्ण देशात प्रत्येक क्षेत्रात सर्वसमावेशक बदल घडले, त्यामुळे देशातील 140 कोटी नागरिकांना असा विश्वास आहे की 2047 मध्ये भारत जगात प्रत्येक क्षेत्रात पहिल्या स्थानावर असेल.
केंद्रीय मंत्री अमीत शाह पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी अनेक कामे केली, जी शतकानुशतके प्रलंबित होती. गेल्या महिन्यातच पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येमधील राम मंदिरात प्रभू श्री राम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. ते म्हणाले की, जवळजवळ 550 वर्षांपासून देशातील प्रत्येक नागरिक अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उभारणीची वाट पाहत होता, आणि पंतप्रधान मोदी यांनी ते काम केले. अशा अनेक कामांना पंतप्रधान मोदी यांनी गती आणि दिशा दिली. ते म्हणाले की, मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात, पहिली 5 वर्षे आधीच्या सरकारांच्या उणीवा पूर्ण करण्यात गेली तर पुढली 5 वर्षे विकसित भारताचा भक्कम पाया घालण्यात आला. आता तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर, पंतप्रधान मोदी अतिशय वेगाने त्याच पायावर भव्य इमारत उभारतील.
केंद्रीय मंत्री अमीत शाह म्हणाले की, महर्षी दयानंद सरस्वती यांची 200 वी जयंती आहे. ते म्हणाले की गुजरातमध्ये जन्मलेल्या महर्षी दयानंद यांनी आपल्या वेदांची पुनर्स्थापना केली. महर्षी दयानंद यांनी संपूर्ण उत्तर भारतात देशभक्ती, स्वातंत्र्य, मातृभाषा आणि वेद, यासाठी तीव्र आंदोलन छेडले.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2005353)
Visitor Counter : 122