उपराष्ट्रपती कार्यालय
शैक्षणिक संस्थांना हाताशी धरुन मुलींच्या शिक्षणासाठी सामाजिक दायित्व निधीतून (CSR) उदारपणे योगदान देण्याचे उपराष्ट्रपती यांचे उद्योगधुरिणांना आवाहन
इंद्रप्रस्थ महिला महाविद्यालयाच्या शताब्दी सोहळ्याला उपराष्ट्रपतीचे संबोधन
Posted On:
07 FEB 2024 2:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 7 फेब्रुवारी 2024
उपराष्ट्रपती, श्री जगदीप धनखड यांनी आज कॉर्पोरेट आणि उद्योग क्षेत्रातील धुरीणांना देशातील शैक्षणिक संस्था, विशेषत: मुलींच्या शिक्षणात गुंतलेल्या शैक्षणिक संस्थांना उदारपणे योगदान देण्याचे आवाहन केले.
इंद्रप्रस्थ महिला महाविद्यालयाच्या शताब्दी सोहळ्यात विद्यार्थिनींना सबोधित करताना, उपराष्ट्रपतींनी शैक्षणिक संस्थांना सामाजिक दायित्व निधीचे(CSR) योगदान देण्याचे आवाहन केले आणि या मुद्द्यावर उद्योगांशी संवाद साधण्यास मला आनंद होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
विद्यार्थी हेच लोकशाहीतील सर्वात मोठे भागधारक असल्याचे सांगत, श्री धनखड यांनी उपस्थित मुलींना आकांक्षा बाळगण्याचे आवाहन केले, जिथे ते त्यांच्या प्रतिभेचा पूर्णपणे लाभ घेऊ शकतील आणि त्यांच्या पूर्ण क्षमतेची जाणीव करून देऊ शकतील, असे वातावरण ज्यांनी आधीच तयार केले आहे, अशा संस्थांचा लाभ घेण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केले.
‘नारी शक्ती वंदन अधिनियम’, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ आणि एलपीजी जोडण्यांचे वितरण यांसारख्या अलीकडील उपक्रमांचा संदर्भ देत श्री धनखड म्हणाले, "या शतकात आमच्या समोर निश्चित रुपरेषा आहे. मुलीच भारताच्या विकासाची व्याख्या करत आहेत!"
दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.योगेश सिंग, नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री आलोक बी श्रीराम, महाविद्यालयातील, प्राध्यापक सदस्य, विद्यार्थी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उपराष्ट्रपतींच्या भाषणाचा संपूर्ण मजकूर वाचण्यासाठी पुढील संकेतस्थळावर क्लिक करा. (https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2003378)
N.Meshram/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2003446)