सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
ज्येष्ठ महिलांचे सक्षमीकरण
Posted On:
06 FEB 2024 4:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2024
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग ज्येष्ठ नागरिकांसाठी एकात्मिक कार्यक्रम (आय. पी. एस. आर. सी.) राबवत आहे. अटल वयो अभ्युदय योजनेचा (ए. व्ही. वाय. ए. वाय.) हा एक घटक आहे. याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे निवारे (वृद्धाश्रम), नियमित काळजी घेणारी केन्द्रे इ. चालवण्यासाठी आणि देखभालीसाठी अशासकीय/स्वयंसेवी संस्थांना अनुदान दिले जाते. वृद्धांना सन्मानाने जगता यावे यासाठी सर्वलिंगी गरीब ज्येष्ठ नागरिकांना निवारा, पोषण, वैद्यकीय सेवा आणि मनोरंजन यासारख्या सुविधा मोफत पुरविल्या जातात. या योजनेंतर्गत, विशेषतः ज्येष्ठ महिलांसाठीच्या ज्येष्ठ नागरिक गृहांना अनुदानही दिले जाते. सध्या आय. पी. एस. आर. सी. अंतर्गत एकूण 604 ज्येष्ठ नागरिक गृहांना पाठबळ दिले जात आहे. त्यापैकी 25 ज्येष्ठ महिलांसाठीची ज्येष्ठ नागरिक गृहे आहेत.
हा विभाग ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य कृती आराखडा देखील राबवत आहे. याअंतर्गत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना खालील बाबींसाठी अनुदान दिले जातेः -
- ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धांची काळजी घेणाऱ्यांचा प्रशिक्षित गट तयार करणे;
- ज्येष्ठ नागरिकांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठी विशेष मोहीम राबवणे;
- ज्येष्ठ नागरिकांच्या, विशेषतः गरीब लोकांच्या कल्याणासाठी जागरूकता निर्माण करणे आणि संवेदनशीलतेसह राज्याभिमुख उपक्रम.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Patil/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2003132)
Visitor Counter : 116