नागरी उड्डाण मंत्रालय

वर्ष 2023 मध्ये जारी करण्यात आलेल्या व्यावसायिक वैमानिक परवान्यांपैकी 18% म्हणजेच 294 परवाने महिला वैमानिकांना जारी करण्यात आले


वर्ष 2022 च्या तुलनेत वर्ष 2023 मध्ये 22% जास्त व्यावसायिक वैमानिक परवाने जारी करण्यात आले

Posted On: 05 FEB 2024 6:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 5 फेब्रुवारी 2024

भारतात महिला वैमानिकांच्या नोंदणीमध्ये भरीव वाढ होत आहे. वर्ष 2023 मध्ये एकूण 1622 व्यावसायिक वैमानिक परवाने (सीपीएल) जारी करण्यात आले आणि त्यापैकी 294 म्हणजे एकूण सीपीएल्सपैकी 18% सीपीएल्स महिला वैमानिकांना देण्यात आले आहेत.

वर्ष 2022 मध्ये जारी करण्यात आलेल्या एकूण सीपीएल्सपेक्षा (240 सीपीएल्स) वर्ष 2023 मध्ये जारी करण्यात आलेल्या सीपीएल्समध्ये (294 सीपीएल्स) 22% ची वाढ दिसून आली आहे.

आजघडीला, विविध भारतीय शेड्युल्ड आणि बिगर-शेड्युल्ड विमानसेवा कंपन्यांमध्ये कार्यरत एकूण विमान कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 14% कर्मचारी महिला वैमानिक आहेत.

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि त्याच्याशी संबंधित संस्थांनी महिला तसेच पुरुष अशा दोन्ही वर्गातील वैमानिकांची संख्या वाढवण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात, बेळगाव, जळगाव, कलबुर्गी,खजुराहो तसेच लीलाबरी या विमानतळांवर कार्यरत नऊ नव्या वैमानिक प्रशिक्षण संस्थांना  (एफटीओ) भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे पारितोषिकपत्रे देणे आणि दुसऱ्या टप्प्यात भावनगर, हुब्बळी, कडापा, किशनगड तसेच सालेम या पाच विमानतळांवर कार्यरत आणखी सहा वैमानिक प्रशिक्षण संस्थांना एफटीओतर्फे भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे पारितोषिकपत्रे देणे अशा उपक्रमांचा यात समावेश आहे.

याशिवाय, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, या उद्योगातील प्रमुख व्यक्ती तसेच आघाडीच्या महिला विमानोड्डाण व्यावसायिक यांच्या सहयोगाने आंतरराष्ट्रीय विमानोड्डाण क्षेत्रातील महिला (डब्ल्यूएआय) – भारत विभाग या संस्थेतर्फे देशभरात विविध जागरुकता निर्मिती कार्यक्रम राबवण्यात येतात. या कार्यक्रमांमध्ये तरुण शाळकरी मुली विशेषतः कमी उत्पन्न गटात मोडणाऱ्या कुटुंबांतील विद्यार्थिनींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येते.

राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या लिखित उत्तरात केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल (डॉ.) व्ही.के.सिंह (निवृत्त) यांनी आज ही माहिती दिली.

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2002734) Visitor Counter : 55


Read this release in: Tamil , Telugu , English , Urdu , Hindi