नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आरसीएस उडान योजनेअंतर्गत 519 हवाई मार्ग कार्यान्वित


या योजनेंतर्गत 2 वॉटर एरोड्रोम्स आणि 9 हेलीपोर्टसह 76 विमानतळ कार्यान्वित

Posted On: 05 FEB 2024 5:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 5 फेब्रुवारी 2024

प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना (आरसीएस) - उडे देश का आम नागरिक (उडान) सुरू झाल्यापासून एकूण  519 हवाई मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत.

उडान योजनेंतर्गत सध्या 2 वॉटर एरोड्रोम्स आणि 9 हेलीपोर्टसह 76 विमानतळ कार्यान्वित करण्यात आले आहेत. आरसीएस अंतर्गत उड्डाणे चालवण्यासाठी 4 विमानतळ तयार आहेत.  09 विमानतळ/हेलिपोर्टची विकासकामे पूर्ण झाली असून परवाने देण्याचे काम प्रगतीपथावर  आहे. उडान योजनेंतर्गत 17 विमानतळ/हेलिपोर्टची विकासकामे प्रगतीपथावर आहेत.  उर्वरित विमानतळांच्या विकासाचे काम नियोजनाच्या टप्प्यात आहे.

जेट एअरवेज, झूम एअर, ट्रूजेट, डेक्कन एअर, एअर ओदीशा यासारख्या काही विमान कंपन्या बंद पडणे,

अधिक देखभाल खर्च, प्रशिक्षित वैमानिकांची कमी उपलब्धता ,3 वर्षांचा व्हीजीएफ कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे देशात एमआरओ सुविधांचा अभाव,विमानांचा तुटवडा, सुटे भाग आणि इंजिनांची कमतरता आणि कमी पीएलएफ इ. अशा विविध कारणांमुळे सध्या 2 वॉटर एरोड्रोमसह 18 विमानतळ तात्पुरते बंद आहेत.

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री जनरल (डॉ) व्ही.के. सिंह (निवृत्त) यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 2002727) Visitor Counter : 120