संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

यंदाचा वायु शक्ती सराव

Posted On: 02 FEB 2024 3:12PM by PIB Mumbai

 

भारतीय हवाई दल 17 फेब्रुवारी 2024 रोजी जैसलमेर जवळ पोखरण हवाईतळावर वायुशक्ती-24 हा सराव करणार आहे. यापूर्वीचा वायुशक्ती सराव 16 फेब्रुवारी 2019 रोजी आयोजित करण्यात आला होता. नेहमीप्रमाणेचवायुशक्ती सराव हे अहोरात्र चालणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या आक्रमक आणि बचावात्मक क्षमतेचे उत्स्फूर्त प्रदर्शन करतील. या सरावात भारतीय लष्करासोबतच्या संयुक्त कारवाईचेही प्रदर्शन होणार आहे.

यावर्षी या सरावात स्वदेशी तेजस, प्रचंड आणि ध्रुवसह 121 विमानांचा सहभाग असेल. इतर सहभागी विमानांमध्ये राफेल, मिराज-2000, सुखोई-30 एमकेआय, जग्वार, हॉक, सी-130जे, चिनूक, अपाचे आणि एमआय -17 यांचा समावेश असेल. जमिनीवरून हवेत मारा करणारे स्वदेशी क्षेपणास्त्र आकाश आणि समर हे घुसखोरी करणाऱ्या विमानाचा शोध घेऊन त्याला पाडण्याची क्षमता सिद्ध करतील. वायु शक्तीचा सराव हा बहुविध हवाई तळांवरून कार्यरत असताना लांब पल्ल्याची, अचूक क्षमता तसेच पारंपरिक शस्त्रे अचूकपणे, वेळेवर आणि विनाशकारी प्रभावासह शस्त्रे वितरित करण्याच्या भारतीय हवाईदलाच्या क्षमतेचे प्रात्यक्षिक असेल. गरुड आणि भारतीय लष्करी घटकांचा समावेश असलेल्या आयएएफचा वाहतूक आणि हेलिकॉप्टर ताफा विशेष प्रदर्शन करेल.

***

S.Patil/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2001943) Visitor Counter : 158


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu