कृषी मंत्रालय
देशाच्या सर्वांगिण विकासाची हमी देणारा अंतरिम अर्थसंकल्प - केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा
Posted On:
01 FEB 2024 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2024
संसदेत आज सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पावर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आज संसदेत सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे भारताचा वेगाने विकास व्हावा या दिशेने मार्गाक्रमण करतानाच्या प्रवासात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या हमींचा आरसाच आहे असे, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटले आहे. या अंतरिम अर्थसंकल्पात देशातील शेतकरी, गरीब, महिला शक्ती आणि युवाशक्तीच्या प्रगतीचे प्रतिबिंब उमटले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने या सर्व घटकांच्या विकासासाठी वचनबद्ध आहे असे मुंडा यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान नक्कीच उंचावेल, असा विश्वासही मुंडा यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरीब, महिला, युवक आणि शेतकरी या सर्व घटकांच्या गरजा, आकांक्षा आणि कल्याण कायमच आपल्या सर्वोच्च प्राधान्यक्रमावर राहील अशी वचनबद्धता दर्शवली असल्याचे त्यांनी मुंडा यांनी म्हटले आहे. सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास-सबका प्रयास या भावनेचे प्रतिबिंब संसदेत आज सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात उमेटले असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांमधे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एकापाठोपाठ एक अनेक ठोस पावले उचलली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN - पीएम-किसान) हे यांपैकीच उचलले एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ११.८० कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळाला असून, कोणत्याही मध्यस्थांशिवाय, पूर्णतः पारदर्शकता बाळगत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 2.81 लाख कोटी रुपये इतकी रक्कम जमा केली गेली अशी माहिती त्यांनी दिली.
आत्मनिर्भर तेलबिया अभियान हा देखील केंद्र सरकारचा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. २०२२ साली या उपक्रमाची घोषणा केली गेली होती, या उपक्रमाच्या माध्यमातून मोहरी, भुईमूग, तीळ, सोयाबीन, सूर्यफूल यांसारख्या तेलबियांच्या बाबतीत 'आत्मनिर्भरतेचे' उद्दीष्ट साध्य करण्यासाठीचे धोरण आखले जाणार आहे असे केंद्रीय मंत्री मुंडा यांनी सांगितले. नॅनो डीएपीची (खताचा प्रकार) व्याप्ती सर्व कृषीहवामानविषयक परिघात येणाऱ्या सर्व क्षेत्रातील विविध पिकांसाठी वाढवली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी सर्वसमावेशक कार्यक्रम आखला जाणार आहे. मत्स्यव्यवसायाला चालना देण्याचे प्रयत्न सुरुच ठेवले जातील, त्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची (PMMSY) अंमलबजावणी यापुढेही सुरुच ठेवली जाईल, त्याअंतर्ग ५ एकात्मिक जल मत्स्यालये (integrated aqua parks) उभारली जातील अशी माहिती मुंडा यांनी दिली.
* * *
S.Bedekar/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2001690)
Visitor Counter : 109