केंद्रीय लोकसेवा आयोग
भारतीय परराष्ट्र सेवेमधील 1990 च्या तुकडीचे अधिकारी संजय वर्मा यांनी संघ लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) सदस्य म्हणून घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ
प्रविष्टि तिथि:
01 FEB 2024 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2024
भारतीय परराष्ट्र सेवेमधील 1990 च्या तुकडीचे अधिकारी संजय वर्मा यांनी आज दुपारी संघ लोकसेवा आयोगाच्या मुख्य इमारतीतील सेंट्रल हॉलमध्ये संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉ.मनोज सोनी यांनी त्यांना शपथ दिली.

संजय वर्मा 1990 मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाले आणि त्यांच्या परदेशात खालीलप्रमाणे नेमणुका झाल्या: स्पेन आणि अंडोरा येथील राजदूत; इथिओपिया, जिबूती आणि आफ्रिकन युनियनचे राजदूत; कौन्सुल जनरल, दुबई; बीजिंग येथील भारतीय दूतावासामध्ये कौन्सिलर (आर्थिक आणि व्यावसायिक), काठमांडू येथील भारतीय दूतावासामध्ये प्रवक्ता आणि कौन्सिलर (माध्यमे, माहिती आणि संस्कृती), मनिला येथील भारतीय दूतावासामध्ये द्वितीय सचिव (माध्यमे, आणि राजकीय) आणि हाँगकाँग येथील भारतीय दूतावासामध्ये आर्थिक आणि व्यावसायिक अधिकारी.
परराष्ट्र मंत्रालयातील त्यांच्या कामगिरीबाबत माहिती: चायना डेस्क; भारतीय परराष्ट्र प्रवक्त्याचे प्रमुख मदतनीस (ओएसडी); संयुक्त सचिव (डीजी) ऊर्जा सुरक्षा आणि राजशिष्टाचार प्रमुख.

संजय वर्मा यांनी मुंबईच्या विल्सन महाविद्यालयामधून सुरुवातीचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या जय हिंद महाविद्यालयामधून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यांनी नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधून आंतरराष्ट्रीय अभ्यासात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांनी भारतीय विद्यापीठ अनुदान आयोगाकडून आंतरराष्ट्रीय अभ्यासात फेलोशिप घेतली होती, याआधी त्यांनी दोराबजी टाटा शिष्यवृत्ती प्राप्त केली होती.
* * *
M.Chopade/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2001611)
आगंतुक पटल : 168