युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
नाडा इंडियाने उत्तेजक पदार्थ विरोध आणि पोषण या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र केले आयोजित
Posted On:
31 JAN 2024 8:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जानेवारी 2024
भारतीय राष्ट्रीय उत्तेजक पदार्थ विरोधी संस्था (नाडा इंडिया) ने भारतीय शारिरीक शिक्षण फाउंडेशन (PEFI) आणि एचएलएम संस्था समूह यांच्या सहकार्याने उत्तेजक पदार्थ विरोध आणि पोषण या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील एक दिवसीय चर्चासत्र आयोजित केले होते. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना कोणत्याही उत्तेजक पदार्थांचा वापर टाळण्याबाबत माहिती आणि साधनांबाबत शिक्षित करून सुसज्ज करणे तसेच योग्य पोषणाद्वारे क्रीडापटूंच्या कामगिरीचा स्तर उंचावण्याबाबत माहिती देणे हे या परिसंवादाचे उद्दिष्ट होते. या परिसंवादात भारतीय राष्ट्रीय उत्तेजक पदार्थ विरोधी संस्थेचे (नाडा इंडिया) महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भार्गव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त आणि अनुभवी हॉकी प्रशिक्षक डॉ. ए.के. बन्सल आणि गाजियाबाद येथील सरकारी जिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भवतोष शंखधर यांनी सन्माननीय अतिथीच्या रुपात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच मुख्य भाषणही केले.
या चर्चासत्रात शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, परिचारक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि क्रीडापटू सहाय्यक कर्मचाऱ्यांसह विविध पार्श्वभूमीतील 300 हून अधिक सहभागी सहभागी झाले होते. नाडा इंडियाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी जय सिंग आणि नोंदणीकृत आहारतज्ज्ञ, FOSTAC फूड सेफ्टी ट्रेनर - हेल्थ सप्लिमेंट्स आणि न्यूट्रास्युटिकल अपर्णा टंडन जैन यांनी सहभागींना मार्गदर्शन केले तसेच निकोप खेळ आणि पोषण या विषयावर त्यांचे विचार मांडले. भावी पिढीला उत्तेजक पदार्थ विरोधी खऱ्या माहितीसह सुसज्ज करून, नाडा इंडिया खेळांमधील सचोटी आणि प्रतिष्ठा अबाधित राखण्याचा तसेच या क्षेत्रात भारताला उज्वल भविष्याकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे.
* * *
R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2000986)
Visitor Counter : 98