पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

नवी दिल्लीत इंडिया गेट इथे 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी पर्यावरणस्नेही जीवनशैली संदर्भातील लाईफ (LiFE) संकल्पनेवर आधारित प्रदर्शनासह उपक्रमांचे आयोजन

Posted On: 31 JAN 2024 4:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 31 जानेवारी 2024

नवी दिल्लीत इंडिया गेट इथे 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी पर्यावरणस्नेही जीवनशैली संदर्भातील लाईफ (LiFE) या संकल्पनेवर आधारित पर्यावरणपूरक उपक्रमांचे राष्ट्रीय प्रदर्शन आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवनात सोप्या पण प्रभावी पर्यावरणपूरक कृती करण्यासाठी प्रेरित करणारी ‘लाईफ’  ही भारताच्या नेतृत्वाखालील जागतिक चळवळ आहे.पर्यावरणस्नेही जीवनशैलीसाठी वैयक्तिक आणि सामूहिक कृती करण्याच्या दृष्टीने तरुणांना वर्तणुकीतील बदलाची प्रेरणा कशाप्रकारे मिळू शकते हे   हा कार्यक्रम ठळकपणे दर्शवेल.

ऊर्जा आणि पाण्याचे संरक्षण करणे, कचरा कमी करणे, शाश्वत अन्न प्रणाली आणि निरोगी जीवनशैली अंगीकारणे आणि एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकचा  वापर न करणे ही लाईफ चळवळीची संकल्पना आहे. कमी अंतरासाठी सायकल वापरणे, सक्रिय वापरात नसलेले नळ बंद करणे, स्थानिक अन्नपदार्थांचे सेवन करणे, नैसर्गिक किंवा सेंद्रिय उत्पादने वापरणे, झाडे लावणे, कचरा कमी करणे आणि घरातील ओला आणि सुका कचरा वेगळा करणे. ही या लाईफ अभियानाअंतर्गत करण्यात येणाऱ्या कृतींची उदाहरणे आहेत. या उपक्रमांमध्ये सायकल रॅलीचा समावेश असून पर्यावरणपूरक आणि निकोप वाहतुकीच्या सुलभतेचे आणि महत्त्वाचे प्रतीक आहे. ही रॅली इंडिया गेटच्या परिसरातून निसर्गरम्य मार्गावरून काढण्यात येईल.

सहभागींना सायकली दिल्या जातील किंवा सहभागी स्वतःच्या सायकली देखील आणू शकतात.

यानंतर एक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाईल ज्यात एक उद्बोधक पथनाट्यही  सादर केले जाईल. लोकांना पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणाप्रती जबाबदार वर्तनाची गरज आहे या यामागचा उद्देश आहे.

कलात्मक गुण असलेल्यांसाठी,कार्यक्रम स्थळी चेहरा रंगवणे आणि पोस्टर तयार करण्याची  स्पर्धा आयोजित केली जाईल, या माध्यमातून सहभाग त्यांच्या पर्यावरणीय संदेशांना चित्रांच्या माध्यमातून आणि सर्जनशीलतेने अभिव्यक्त करतील.लाईफ संकल्पना अवलंबण्यासाठी  कशाप्रकारे कृती केली जाऊ शकते हे तपशीलवार दर्शवणारे प्रात्यक्षिक मॉडेल देखील असतील.

 

R.Aghor/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2000879) Visitor Counter : 77