अर्थ मंत्रालय

पीएफआरडीए -ट्रेस च्या (ट्रॅकिंग रिपोर्टिंग ॲनालिटिक्स आणि अनुपालन ई-मंच) डिझाइन, विकास, अंमलबजावणी आणि देखभाल यासाठी सिस्टम इंटिग्रेटरच्या (एसआय) निवडीसाठी बोली लावण्याचे पीएफआरडीएचे आवाहन


कंपन्यांकडून नियामक आणि पर्यवेक्षी अनुपालन अहवाल सादर करण्यासाठी पीएफआरडीए -ट्रेस हे एक व्यापक साधन म्हणून काम करेल

Posted On: 31 JAN 2024 2:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 31 जानेवारी 2024

निवृत्तिवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने  (पीएफआरडीए) तंत्रज्ञान आर्किटेक्चर (टीएआरसीएच) प्रकल्पाचा भाग म्हणून पीएफआरडीए -ट्रेस आरपीएफ साठी निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी संभाव्य बोलीदारांकडून बोली लावण्याचे आवाहन केले आहे.

कंपन्यांद्वारे नियामक आणि पर्यवेक्षी अनुपालन अहवाल सादर करणे, अहवाल आणि माहिती पीएफआरडीए सोबत सामायिक करणे, कार्यांचे निरीक्षण करणे, पीएफआरडीए विभागांसाठी सादरीकरणाचा आढावा  आणि मागोवा घेण्यासाठी कार्यप्रवाह सुलभ करणे, निरीक्षणे आणि सूचना नोंदवण्यासाठी  संवाद प्रस्थापित करणे आणि कंपन्यांद्वारे सादर केलेल्या अहवाल आणि डेटासाठी प्रमाणीकरण प्रक्रिया समाविष्ट करण्यासाठी पीएफआरडीए -ट्रेस हे सर्वसमावेशक साधन म्हणून काम करेल.

पीएफआरडीए -ट्रेस हा टीएआरसीएच प्रकल्पाचा दुसरा टप्पा आहे आणि पीएफआरडीए विशेषत: या मॉड्यूलसाठी सिस्टम इंटिग्रेटर (एसआय) विक्रेता निवडत आहे. सिस्टम इंटिग्रेटर सध्याच्या प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी, सुधारित कार्यप्रवाह प्रस्तावित करण्यासाठी आणि पीएफआरडीए -ट्रेस साठी डिझाइन, विकास, सानुकूलन, अंमलबजावणी आणि देखभाल सेवा प्रदान करण्यासाठी उत्तरदायी असेल. यशस्वी बोलीदार पीएफआरडीए च्या डिजिटल परिवर्तन प्रवासात महत्त्वपूर्ण आणि निर्णायक भूमिका बजावेल.

स्वारस्य असलेल्या तंत्रज्ञान कंपन्या पीएफआरडीए संकेतस्थळावर (https://www.pfrda.org.in)

किंवा केंद्रीय सार्वजनिक खरेदी पोर्टलवर (https://eprocure.gov.in/epublish/app )

पीएफआरडीए-ट्रेस आरएफपीसाठी निविदा कागदपत्रे सादर करू शकतात.

बोली सादर करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 दुपारी 3  वाजेपर्यंत आहे.

अधिक माहिती आणि स्पष्टीकरणासाठी, इच्छुक बोलीदार निविदा दस्तऐवजात नमूद केलेल्या नियुक्त संवाद माध्यमांद्वारे पीएफआरडीएशी संपर्क साधू शकतात.

 

Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2000821) Visitor Counter : 68