युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
एनसीईआरटीसह नाडा इंडियाच्या वतीने ''निःपक्षपणा अबाधित राखण्यासाठी : वाडाच्या प्रतिबंधित पदार्थांच्या विरोधात भूमिका” या विषयावर सत्र आयोजित
प्रविष्टि तिथि:
30 JAN 2024 9:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 30 जानेवारी 2024
भारताची राष्ट्रीय उत्तेजक पदार्थ विरोधी संस्था (नाडा इंडिया) आणि राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी )यांनी एकत्र येऊन 'निःपक्षपणा अबाधित राखण्यासाठी : जागतिक उत्तेजक पदार्थ विरोधी संस्थेच्या (वाडा) प्रतिबंधित पदार्थांच्या विरोधात भूमिका” या विषयावर थेट सत्र आयोजित केले होते.
खेळांमध्ये प्रतिबंधित पदार्थांच्या हानिकारक प्रभावांबद्दल जागरुकता वाढवणे आणि खेळाडूंमध्ये निःपक्ष खेळ आणि सचोटीची संस्कृती वाढवणे हे या सत्राचे उद्दिष्ट होते. यात खेळाडू, प्रशिक्षक, शिक्षक आणि क्रीडाप्रेमींसह विविध प्रेक्षक सहभागी झाले होते. मान्यवर वक्त्यांमध्ये डॉ कर्नल राणा के चेंगप्पा आणि डॉ मलिका शर्मा यांचा समावेश होता, त्यांनी क्रीडा क्षेत्रातील डोपिंगमुळे उद्भवलेल्या आव्हानांबद्दल त्यांचा सूक्ष्म दृष्टोकोन आणि अनुभव मांडले.

R.Aghor/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2000695)
आगंतुक पटल : 105