रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेने 1 एप्रिल 2023 ते 31 डिसेंबर 2023 या 9 महिन्यांत आतापर्यंतचा सर्वाधिक भांडवली खर्चाचा केला वापर
डिसेंबर 2023 पर्यंत 75% भांडवली खर्च वापरला गेला
गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत भांडवली खर्चाचा वापर सुमारे 33% अधिक आहे
Posted On:
29 JAN 2024 4:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जानेवारी 2024
भारतीय रेल्वेने डिसेंबर 2023 पर्यंतच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत अंदाजे 75% भांडवली खर्चाचा जो आतापर्यंतचा सर्वाधिक आहे,त्याचा वापर केला आहे. भारतीय रेल्वेने 1,95,929,97 कोटी रुपये डिसेंबर 2023 पर्यंत, जे या आर्थिक वर्षात रेल्वेच्या एकूण 2,62लाख कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाच्या अंदाजे 75% पर्यंत आहे.
डिसेंबर 2022 मध्ये याच कालावधीत, भारतीय रेल्वेने 1,46,248.73 रुपये कोटीचा भांडवली खर्चाचा वापर केला होता. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यावर्षी भांडवली खर्चाचा वापर अंदाजे 33% अधिक आहे.
ही गुंतवणूक नवीन मार्ग, दुहेरीकरण, प्रमाणभूत रेल्वेमार्ग रूपांतरण आणि प्रवाशांच्या सुविधा वाढवणे यासारख्या विविध पायाभूत सुविधा या प्रकल्पांमध्ये दिसून येतात. रेल्वेमध्ये प्रवाशांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. यादृष्टीने सुरक्षेशी संबंधित कामांमध्ये भरीव गुंतवणूक करण्यात आली आहे.
* * *
NM/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2000360)
Visitor Counter : 117