गृह मंत्रालय
जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार-2023 प्रदान करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी
Posted On:
25 JAN 2024 3:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2024
राष्ट्रपतींनी, 31 जणांना जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार - 2023 प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. यात 03 सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, 07 उत्तम जीवन रक्षा पदक आणि 21 जीवन रक्षा पदक यांचा समावेश आहे. तीन जणांना मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे:-
सर्वोत्कृष्ट जीवन रक्षा पदक
- मास्टर अँथनी वनमाविया (मरणोत्तर), मिझोरम
- लोडी लालरेमरुती (मरणोत्तर), मिझोरम
- सूरज आर (मरणोत्तर), केंद्रीय राखीव पोलीस दल
उत्तम जीवन रक्षा पदक
- साहिल भीसू लाड, गोवा
- काजल कुमारी, झारखंड
- नवीन कुमार डी, तेलंगणा
- विनोद कुमार, सीमा रस्ते संघटना
- हवालदार शेरा राम, संरक्षण मंत्रालय
- मुकेश कुमार, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल
- नरेश कुमार, राष्ट्रीय तपास संस्था
जीवन रक्षा पदक
- एन एस अनिल कुमार, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह
- जीतम परमेश्वर राव, आंध्र प्रदेश
- समरजीत बसुमतारी, असम
- सुदेश कुमार, चंडीगड
- जस्टिन जोर्ज, केरळ
- विल्सन, केरळ
- पद्मा थिंलेस, लद्दाख
- मोहम्मद अफजल, लद्दाख
- आदीका राजाराम पाटील, महाराष्ट्र
- प्रियंका भारत काळे, महाराष्ट्र
- सोनाली सुनील बालोडे, महाराष्ट्र
- मारिया माइकल ए, तमिळनाडू
- एस विजयकुमार, तमिळनाडू
- नरेश जोशी, उत्तराखंड
- अर्जुन मलिक, सीमा रस्ते संघटना
- अमित कुमार सिंह, सीमा सुरक्षा दल
- शेर सिंह, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल
- सोनू शर्मा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल
- अबदुल हमीद, संरक्षण मंत्रालय
- सुनील कुमार मिश्रा, संरक्षण मंत्रालय
- शशिकांत कुमार, रेल्वे मंत्रालय
एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्याच्या मानवतावादी कृतीसाठी जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार प्रदान केले जातात. सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, उत्तम जीवन रक्षा पदक आणि जीवन रक्षा पदक या तीन श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जातो. सर्व क्षेत्रातील व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. हे पुरस्कार मरणोत्तर देखील दिले जातात.
हा पुरस्कार (पदक, केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र आणि एकरकमी आर्थिक भत्ता) पुरस्कार विजेत्याला केंद्रीय मंत्रालय/ संस्था/ राज्य सरकारद्वारे प्रदान केले जातात.
* * *
NM/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1999563)
Visitor Counter : 257