शिक्षण मंत्रालय

युवा संगममध्ये (चौथा टप्पा) सहभागासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू


युवा संगमच्या विविध टप्प्यांमधील 69 दौऱ्यांमध्ये देशातील 2870 हून अधिक तरुणांनी घेतला सहभाग

Posted On: 25 JAN 2024 2:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जानेवारी 2024

 

एक भारत श्रेष्ठ भारत (ईबीएसबी) अंतर्गत युवा संगमच्या चौथ्या टप्प्यासाठी नोंदणी पोर्टलचा प्रारंभ आज शिक्षण मंत्रालयाने केला. भारतातील विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील तरुणांमधील लोकांसोबत  संपर्क दृढ करण्यासाठी युवा संगम हा केंद्र  सरकारचा एक उपक्रम आहे. 18-30 वयोगटातील स्वारस्य असलेले तरुण, प्रामुख्याने विद्यार्थी, एनएसएस /एनवायकेएस स्वयंसेवक, नोकरदार/स्वयंरोजगार असलेल्या  व्यक्ती, इत्यादी 2023 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाच्या आगामी टप्प्यात सहभागी होण्यासाठी युवा संगम  पोर्टलद्वारे नोंदणी करू शकतात. .04 फेब्रुवारी 2024 पर्यंत नोंदणी स्वीकारली जाईल.

तपशीलवार माहिती येथे उपलब्ध आहे: https://ebsb.aicte-india.org/

31 ऑक्टोबर 2015 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दिवसादरम्यान पंतप्रधान   नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रांतील लोकांमधील शाश्वत आणि संरचित सांस्कृतिक संपर्काची संकल्पना मांडली होती.ही कल्पना पुढे नेण्यासाठी, 31 ऑक्टोबर 2016 रोजी  एक भारत श्रेष्ठ भारत  उपक्रमाचा आरंभ करण्यात आला.

युवा संगमच्या चौथ्या टप्प्यासाठी देशभरातील बावीस प्रख्यात संस्था निश्चित करण्यात आल्या आहेत, या दरम्यान या राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील सहभागी, अनुक्रमे राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या नोडल उच्च शिक्षण संस्थांच्या  नेतृत्वाखाली, त्यांच्याशी  संलग्न  राज्य/केंद्रशासित प्रदेशांना भेट देतील. युवा संगम हा सरकारचा असा एक उपक्रम आहे जो तरुणांसाठी शैक्षणिक-सह-सांस्कृतिक दौरा आयोजित करण्यावर लक्ष केंद्रित करतो. विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील तरुण 5-7 दिवस (प्रवासाचे दिवस वगळून) त्यांच्याशी संलग्न राज्यांना  भेट देतील या  दरम्यान त्यांना राज्याच्या विविध पैलूंचा विलक्षण अनुभव मिळेल आणि स्थानिक तरुणांशी संवाद साधण्याची आणि सखोलपणे जाणून घेण्याची संधी मिळेल.

एक भारत श्रेष्ठ भारतम उपक्रमामध्ये   गृह व्यवहार, संस्कृती, पर्यटन, युवा व्यवहार  आणि क्रीडा, माहिती आणि प्रसारण, ईशान्य क्षेत्र विकास विभाग आणि रेल्वे यांचा समावेश असलेल्या संपूर्ण सरकार दृष्टीकोनाचे उदाहरण असलेल्या मंत्रालय/विभाग/एजन्सी यांचा समावेश आहे. युवा संगमच्या मागील टप्प्यांमध्ये तीन टप्प्यात अनुक्रमे 16767, 21380 आणि 29,151 नोंदणीसह  तरुण तरुणींनी उत्साहवर्धक  सहभाग नोंदवला गेला आहे.

 

* * *

Jaydevi PS/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1999510) Visitor Counter : 96