कोळसा मंत्रालय
कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पांना तीन श्रेणींमध्ये प्रोत्साहन देण्याच्या योजनेंतर्गत सरकारी सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आणि खासगी क्षेत्रातील कोळसा/लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची या योजनेला मंजुरी
Posted On:
24 JAN 2024 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जानेवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आणि खासगी क्षेत्रातील कोळसा/लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी 8,500 कोटी रुपयांच्या खर्चासह तीन श्रेणींमध्ये कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याच्या योजनेला मंजुरी देण्यात आली.
केंद्रीय मंत्रिमंडळाने योजनेला दिलेली मंजुरी खालीलप्रमाणे :
- तीन श्रेणींमधील कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य म्हणून एकूण 8,500 कोटी रुपये दिले जातील.
- श्रेणी I मध्ये, सरकारी सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांसाठी 4,050 कोटी रुपयांची तरतूद केली आहे ज्यामध्ये 3 प्रकल्पांना 1,350 कोटी रुपये एकरकमी अनुदान किंवा कॅपेक्सच्या (भांडवली खर्चाच्या) 15% यापैकी जे कमी असेल तितके पाठबळ दिले जाईल.
- श्रेणी II मध्ये, खासगी क्षेत्रासाठी तसेच सरकारी कंपन्यांसाठी 3,850 कोटी रुपयांची तरतूद केली आहे ज्यामध्ये प्रत्येक प्रकल्पासाठी 1,000 कोटी रुपये एकरकमी अनुदान किंवा कॅपेक्सच्या 15% यापैकी जे कमी असेल तितके पाठबळ दिले जाईल. दर-आधारित बोली प्रक्रियेवर किमान एका प्रकल्पाची बोली लावली जाईल आणि त्याचे निकष नीती आयोगाशी सल्लामसलत करून ठरवले जातील.
- श्रेणी III मध्ये, प्रात्यक्षिक प्रकल्प (स्वदेशी तंत्रज्ञान) आणि/किंवा लघु-उत्पादन-आधारित गॅसिफिकेशन सयंत्रासाठी 600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, ज्या अंतर्गत 100 कोटी रुपये एकरकमी अनुदान किंवा कॅपेक्सच्या 15% यापैकी जे कमी असेल तितके पाठबळ किमान कॅपेक्स 100 कोटी रुपये आणि 1500 Nm3/तास Syn गॅसचे किमान उत्पादन असणाऱ्या निवडक संस्थेला दिले जाईल.
- श्रेणी II आणि III अंतर्गत संस्थांची निवड स्पर्धात्मक आणि पारदर्शक बोली प्रक्रियेद्वारे केली जाईल.
- निवडलेल्या संस्थेला अनुदान दोन समान हप्त्यांमध्ये दिले जाईल.
- एकूण आर्थिक खर्च 8,500 कोटी रुपयांच्या आत राहण्याच्या अटीच्या अधीन राहून कोळसा सचिवांच्या अध्यक्षतेखालील EGoS ला योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक असलेले कोणतेही बदल करण्यासाठी पूर्ण अधिकार दिले जातील.
* * *
R.Aghor/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1999293)
Visitor Counter : 121