युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे फिट इंडिया अभियान ‘फिट इंडिया चॅम्पियन्स’ पॉडकास्ट मालिका सुरू करण्यासाठी सज्ज
शीतल देवी, नीरज चोप्रा यांच्या पॉडकास्टने फिट इंडिया चॅम्पियन्स पॉडकास्ट मालिकेचा होणार प्रारंभ
यूट्यूबसह अनेक डिजिटल आणि समाजमाध्यम मंचांवर ही दहा भागांची मालिका उपलब्ध होणार
Posted On:
23 JAN 2024 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2024
फिट इंडिया अभियान हा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा पथदर्शी कार्यक्रम, ‘फिट इंडिया चॅम्पियन्स’ पॉडकास्ट मालिका सुरू करण्यासाठी सज्ज आहे.
फिटनेस क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी जीओक्यूआयआयच्या (GOQii ) सहकार्यातून ही मालिका सुरु केली जात आहे. ही कंपनी डिजिटल आणि मल्टीमीडिया तंत्रज्ञानाद्वारे आरोग्य व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत आहे.

भारताच्या क्रीडा नायक/नायिकांची उल्लेखनीय कामगिरी आणि प्रेरणादायी कथा मांडणारी ही एक अभिनव मालिका असून या मालिकेचे प्रसारण 27 जानेवारीपासून सुरू होत आहे. हाँगझोऊ येथे आयोजित 2023 च्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये पदार्पणातच सुवर्णपदक जिंकून नेत्रदीपक कामगिरी करणारी, दोन्ही हात नसलेली तिरंदाज शीतल देवी सोबतचे पॉडकास्ट या मालिकेच्या सुरुवातीच्या भागात ऐकायला मिळणार आहे.
“मी दररोज 6-7 तास सराव करते, माझ्या दिवसाची सुरुवात धनुष्याची दोरी ओढून होते आणि नंतर माझ्या भावा आणि बहिणीसोबत सामने खेळते. ‘कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती’ हा माझा आंतरिक मंत्र आहे आणि यामुळे मला सामने जिंकण्यास मदत होते,” असे जम्मूच्या तिरंदाज शीतल देवी हिने या पॉडकास्टमध्ये सांगितले आहे .
त्यानंतर जागतिक आणि ऑलिम्पिक भालाफेक चॅम्पियन नीरज चोप्रा या पॉडकास्ट मालिकेत असणार आहे त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीतील न ऐकलेली बाजू आणि एक तरुण म्हणून त्याच्या आयुष्यातील चढउतार आणि आयुष्यातील वळणांविषयी रंजक माहिती, त्याने या भागात दिली आहे. जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडूंपैकी एक असलेला नीरज चोप्रा याने , निरोगी जीवनशैली अवलंबणे कशाप्रकारे चांगले आहे आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी निरोगी जीवनशैली कशी उपयुक्त ठरते, हे ही सांगितले आहे.
तंदुरुस्तीच्या गरजेवर भर देत नीरज चोप्राने सांगितले : पंतप्रधानांनी ‘फिटनेस की डोस, आधा घंटा रोज’ असा मंत्र दिला आहे. मात्र आपण प्रशिक्षण वेळेव्यतिरिक्त दिवसातील 30 मिनिटे यासाठी देऊ शकता. हे तुमच्या शरीराच्या गरजांवर अवलंबून असते आणि ते योग्य संतुलन राखून आणि तुमच्या शरीरावर जास्त ताण न देता केले पाहिजे.” नीरज चोप्राचा भाग 10. फेब्रुवारीला प्रसारित होणार आहे.
10 भागांची मालिका, खेळाडूंचे व्यक्तीगत आयुष्य आणि इतर अंतरंगांच्या परिपूर्ण संवादांनी परिपूर्ण आहे . भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या उपमहासंचालक एकता विश्नोई या मालिकेचे सूत्रसंचालन केले आहे.त्या फिट इंडियाच्या अभियान संचालक देखील आहेत. या मालिकेचे भाग यु ट्यूबसह अनेक डिजिटल आणि समाजमाध्यम मंचावर उपलब्ध असतील.
दर दुसर्या आणि चौथ्या शनिवारी प्रदर्शित होणार्या या भागांमध्ये अर्जुन वाजपेयी सारखे विविध खेळाडू आणि तंदुरुस्तीच्या क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्ती देखील असतील. टोक्यो पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता सुमित अंतिल, राष्ट्रकुल 2022 मधील सुवर्णपदक विजेती मुष्टियोद्धा नितू घंघास हे देखील फिट इंडिया चॅम्पियन्स पॉडकास्ट मालिकेत सहभागी होणार आहेत.
* * *
R.Aghor/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1998881)