संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाच्या मोहीम सज्जता प्लॅटफॉर्मने एडनच्या आखातातील एका सागरी घटनेत केले सहाय्य
Posted On:
18 JAN 2024 5:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 18 जानेवारी 2024
17 जानेवारी 24 रोजी रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी सागरी चाच्यांनी एमव्ही जेन्को पिकार्डी जहाजावर ड्रोन हल्ला केल्याचे समजताच भारतीय नौदलाने एडनच्या आखातात चाचेगिरी विरोधी कारवाईसाठी आयएनएस विशाखापट्टणम तैनात केले.
एडनच्या आखातात चाचेगिरी विरोधी गस्तीदरम्यान आयएनएस विशाखापट्टणमकडे मदतीची मागणी करण्यात आली तेव्हा सहाय्य प्रदान करण्यासाठी 18 जानेवारी 24 रोजी रात्री साडे बारा वाजता जहाजे रोखण्यात आली. एमव्ही जेन्को पिकार्डी जहाजावर 22 कर्मचारी (09 भारतीय) होते. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून आणि आग आटोक्यात आल्याची नोंद आहे.
आयएनएस विशाखापट्टणमचे भारतीय नौदल इओडी विशेषज्ञ 18 जानेवारी 24 च्या पहाटे क्षतिग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जहाजावर चढले. इओडी तज्ज्ञांनी सखोल तपासणीनंतर हे क्षेत्र पुढील वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे सांगितल्यावर जहाज पुढच्या बंदराकडे मार्गस्थ झाले आहे.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1997425)
Visitor Counter : 98