पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा
द्विपक्षीय विशेष आणि विशेषाधिकारित धोरणात्मक सहकार्य आणखी दृढ करण्यासाठी मार्गदर्शक आराखडा विकसित करण्यासाठी उभय नेत्यांमध्ये सहमती
2024 मधील रशियाच्या ब्रीक्स अध्यक्षपदासाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
15 JAN 2024 7:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 15 जानेवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियन महासंघाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधील अलीकडील उच्चस्तरीय विचारविनिमयाचा पाठपुरावा करताना द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक मुद्यांसंदर्भातील प्रगतीचा आढावा घेतला.
त्यांनी द्विपक्षीय संबंधांमधील घडामोडींचे सकारात्मक मूल्यांकन केले आणि आणि भारत-रशिया विशेष आणि विशेषाधिकारित धोरणात्मक सहकार्य आणखी दृढ करण्याच्या अनुषंगाने, भविष्यातील उपक्रमांसाठी एक विकसित आराखडा विकसित करण्यास सहमती दर्शवली.
उभय नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही विचारविनिमय केला.
पंतप्रधानांनी 2024 मधील रशियाच्या ब्रिक्स अध्यक्षपदासाठी शुभेच्छा दिल्या आणि भारताच्या पूर्ण पाठिंब्याचे आश्वासन दिले.
दोन्ही नेत्यांनी संपर्कात राहण्यासाठी सहमती दर्शवली.
S.Kakade/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1996361)
Visitor Counter : 101
Read this release in:
Telugu
,
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam