राष्ट्रपती कार्यालय
आगामी लोहडी, मकर संक्रांती, माघ बिहू आणि पोंगल या सणांनिमित्त राष्ट्रपतींच्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
12 JAN 2024 6:42PM by PIB Mumbai
आगामी लोहडी, मकर संक्रांती, माघ बिहू आणि पोंगल या सणांनिमित्त (जे अनुक्रमे 13, 14 आणि 15 जानेवारी रोजी आहेत) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात राष्ट्रपती म्हणतात, ''लोहडी, मकर संक्रांती, माघ बिहू आणि पोंगल या शुभप्रसंगी मी देशात तसेच परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना शुभेच्छा देते.
हे सण आपल्या सांस्कृतिक वारशाचे मूर्त स्वरूप आहेत तसेच विविधतेतील एकतेचे प्रतीक आहेत. या प्रसंगी, आम्ही पवित्र नद्यांमध्ये स्नान करतो आणि दान आणि पुण्यकर्मातून आनंद प्राप्त करतो. देशभरात वेगवेगळ्या स्वरुपात साजरे होणारे हे सण सामाजिक सौहार्द, एकता आणि बंधुता वृद्धिंगत करतात.
शेतीशी संबंधित हे सण पर्यावरण संवर्धनालाही चालना देतात. हे सण आपल्या अन्नदाता शेतकर्यांच्या अथक कष्टांचा सन्मान करण्याची संधी देतात.
या सणांच्या माध्यमातून प्रेम आणि सौहार्दाची भावना वृद्धिंगत होवो आणि आपल्या देशात अधिक समृद्धी आणि शांतता नांदो, अशा सदिच्छा मी व्यक्त करते.''
राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी येथे क्लिक करा-
***
S.Bedekar/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1995713)
आगंतुक पटल : 132