वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“भारत टेक्स 2024” अंतर्गत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे “तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील नवोन्मेषाला चालना –तांत्रिक वस्त्रोद्योगातील सर्जनशीलतेला वाव देण्यासाठीचे हॅकेथॉन”चे आयोजन

Posted On: 10 JAN 2024 5:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 10 जानेवारी 2024

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियाना (एनटीटीएम) अंतर्गत “तांत्रिक  वस्त्रोद्योग क्षेत्रातील नवोन्मेषाला चालना – तांत्रिक वस्त्रोद्योगातील सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी हॅकेथॉन” या उपक्रमाचे आयोजन करत आहे. “भारत टेक्स 2024” अंतर्गत 26 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत हे हॅकेथॉन होणार आहे.

या क्षेत्राशी संबंधित विद्यार्थी, संशोधक, उद्योजक आणि औद्योगिक व्यावसायिक यांना एकत्र आणणारा मंच निर्माण करणे हा या हॅकेथॉनचा प्राथमिक उद्देश आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचे राष्ट्रीय तांत्रिक  वस्त्रोद्योग अभियान या हॅकेथॉनचे प्रायोजक आणि भागीदार असणार आहे.

“भारत टेक्स 2024” मध्ये प्रमुख प्रकल्पांची प्रगती आणि सफलता यांचे सादरीकरण करण्याचा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचा मानस आहे.

या हॅकेथॉन स्पर्धेचे तीन टप्पे असतील; संकल्पनात्मक टप्पा, विकासात्मक टप्पा आणि सादरीकरण तसेच परीक्षण टप्पा. ही स्पर्धा पुढील 10 संकल्पनात्मक विषयांवर आधारित असेल: स्मार्ट वस्त्रे, शाश्वत वस्त्रे, वैद्यकीय वस्त्रे, संरक्षणात्मक वस्त्रे, संमिश्र वस्त्रे, फंक्शनल फॅब्रिक्स , विशेष फायबरचा  विकास आणि उच्च- कार्यक्षमता असणारे फायबर ,स्वदेशी यंत्रे/ साधने/ उपकरणे यांचा विकास, तांत्रिक वस्त्रांचे अप्लाईड सायन्सेस आणि अभियांत्रिकी तसेच या क्षेत्राच्या व्याप्तीमधील इतर कोणत्याही घटकांशी एकत्रीकरण या हॅकेथॉन स्पर्धेच्या पहिल्या तीन विजेत्यांचा तांत्रिक वस्त्रे क्षेत्रातील उदयोन्मुख संशोधकांना देण्यात येणाऱ्या संशोधन उद्योजकतेसाठीच्या सहाय्याअंतर्गत (जीआरईएटी) निधीसाठी विचार करण्यात येईल. या मध्ये जास्तीतजास्त 18 महिन्यांसाठी 50 लाख रुपयांपर्यंतचे सहाय्य देण्यात येते मात्र त्यासाठी जीआरईएटी योजनेच्या इतर पात्रता निकषांची पूर्तता होणे आवश्यक आहे.
 
या हॅकेथॉन स्पर्धेसाठीचे प्रस्ताव 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत “हॅकेथॉन – (प्रस्तावाचा विषय) भारत टेक्स 2024” या विषय सूत्रासह nttm-textiles[at]gov[dot]in
 
यासंदर्भातील अधिक माहिती आणि चौकशीसाठी कृपया पुढील संकेतस्थळाला भेट द्या: https://bharat-tex.com/


S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1994878) Visitor Counter : 95