संरक्षण मंत्रालय
जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये आणखी चार एनसीसी युनिट्सची स्थापना; संरक्षणमंत्र्यांनी या प्रस्तावाला दिली मंजुरी
Posted On:
08 JAN 2024 9:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 8 जानेवारी 2024
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये आणखी चार राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) युनिट्स वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामध्ये उधमपूर (जम्मू आणि काश्मीर), कुपवाडा (जम्मू आणि काश्मीर) आणि कारगिल (लडाख) येथे प्रत्येकी एक मिश्र (मुले आणि मुली) लष्करी बटालियन आणि उधमपूर (जम्मू आणि काश्मीर) येथे एक हवाई तुकडी यांचा समावेश आहे. परिणामी जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमधील 27,870 कॅडेट्सची सध्याची संख्या 12,860 कॅडेट्सने वाढवली जाईल. अशा प्रकारे त्यात 46.1 टक्क्याने वाढ होईल. सध्या, संचालनालयाची दोन गट मुख्यालये आहेत, एकूण 10 एनसीसी युनिट्स आहेत, ज्यात तीनही भौगोलिक प्रदेशांचा समावेश आहे. या विस्तारामुळे प्रदेशातील तरुणांचे मनोबल वाढेल, जे राष्ट्र उभारणीत महत्त्वाचे योगदान देतील.
S.Patil/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1994364)