सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंटरनॅशनल पर्पल फेस्ट 2024: सर्वसमावेशकता आणि सक्षमीकरण यांचा सुंदर मिलाफ असलेल्या जागतिक स्तरावरच्या महोत्सवाचा आज गोव्यात शानदार प्रारंभ

Posted On: 08 JAN 2024 10:12AM by PIB Mumbai

सर्वसमावेशकता आणि सक्षमीकरण यांचा सुंदर मिलाफ असलेल्या इंटरनॅशनल पर्पल फेस्ट 2024 या जागतिक स्तरावरच्या महोत्सवाचा आज गोव्यात शानदार प्रारंभ होणार आहे. 13 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग व्यक्तींसाठीचे राज्य आयुक्त कार्यालय, गोवा सरकारचे समाज कल्याण संचालनालय आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग व्यक्तींसाठीच्या सक्षमीकरण विभागाच्या सहकार्याने करण्यात आले आहे.
या महोत्सवाच्या दिमाखदार उदघाटन सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत प्रमुख अतिथी म्हणून तसेच केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे आणि केंद्रीय पर्यटन, बंदरे आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक देखील उपस्थित राहणार आहेत.
या उद्घाटन समारंभात संगीत, नृत्य आणि मनोरंजनपर आकर्षक आणि बहारदार कार्यक्रमांच्या सादरीकरणातून दिव्यांग व्यक्तींच्या यशोगाथा सादर करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.
या उदघाटन समारंभामधील एक अदभुतरम्य क्षण म्हणजे पर्पल फेस्टच्या 'धुमाळ' या सर्वसमावेशकता आणि एकतेचे प्रतीक असलेल्या गीताचे सादरीकरण असेल. यामध्ये गोव्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक दिव्यांग व्यक्ती आपली कला सादर करणार आहेत.

***

SonalT/BhaktiS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1994103) Visitor Counter : 139