महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महिला आणि बाल विकास मंत्रालय  योजनांच्या 1 लाखाहून अधिक लाभार्थींनी “मेरी कहानी मेरी जुबानी” अंतर्गत विकसित भारत संकल्प यात्रेत कथन केले आपले  अनुभव


सुदृढ बालक स्पर्धेच्या माध्यमातून निवडल्या गेलेल्या 1.07  लाख मुलांचा सत्कार आणि 1.38 लाख जणांनी केली ऑन स्पॉट नोंदणी

Posted On: 06 JAN 2024 5:56PM by PIB Mumbai

 

महिला आणि बाल विकास मंत्रालय 'विकसित भारत संकल्प यात्रा' या देशव्यापी मोहिमेत सहभागी झाले आहे.  देशभरातील सर्व ग्रामपंचायती, नगर पंचायती आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रातील विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या मात्र आजवर योजनांचा लाभ न घेतलेल्या वंचित लोकांपर्यंत पोहोचून जनजागृती करण्याच्या उद्देशाने तसेच भारत सरकारच्या योजनांची संपृक्तता साध्य करण्यासाठी देशभरात ही मोहीम राबवली जात आहे. या यात्रेत विविध योजनांमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या नावनोंदणीवर, माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर तसेच सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी त्यांच्या वैयक्तिक कहाण्या  आणि अनुभवाच्या देवाणघेवाणीद्वारे संवाद साधणे यावर भर दिला जात आहे.

समावेशक  सरकारी दृष्टीकोनाचा अवलंब करून, भारत सरकारची विविध मंत्रालये आणि विभाग, राज्य सरकारे, केंद्र सरकारच्या संस्था आणि इतर संस्था यांच्या सक्रिय सहभागाने नागरिकांच्या कल्याणासाठी तसेच विकसित भारताची संकल्पना साकार करण्यासाठी सर्व संबंधितांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली जात आहे. 

महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या क्षेत्रीय कार्यकर्त्यांद्वारे या यात्रेदरम्यान हाती घेतले जाणारे संक्षिप्त उपक्रम :

लाभार्थ्यांना महिला बाल विकास विभागाच्या  विविध योजनांद्वारे मिळालेल्या लाभांबद्दल बोलण्याची संधी "मेरी कहानी मेरी जुबानी" उपक्रमाद्वारे दिली जाते.

सुदृढ बालक स्पर्धांचे आयोजन तसेच सुदृढ बालकांचा सत्कार.

अंगणवाडी सेवा योजनेत नावनोंदणीसाठी लाभार्थ्यांची ऑन स्पॉट नोंदणी.

सर्व ग्रामपंचायतींमध्ये जनसामान्यांना महिला आणि बालविकास विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी आणि योजनांच्या माहितीचा प्रसार सुनिश्चित करण्यात आला.

4 जानेवारी 2024 पर्यंत, विकसित भारत डॅशबोर्डनुसार, विविध मंत्रालयांच्या सुमारे 60 योजनांमधील 14.70 लाख लाभार्थ्यांनी मेरी कहानी मेरी जुबानी’ (एमकेएमझेड)अंतर्गत त्यांचे अनुभव कथन केले आहेत, त्यापैकी 1,03,594 जण महिला आणि बाल विकास मंत्रालय अंतर्गत योजनांचे लाभार्थी आहेत. (पोषण  अभियानाचे 54,258 लाभार्थी आणि प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे 49,336 लाभार्थी).

S. No.

Name of the State

Progress
Uploaded/
GPs
covered

People
Attended

Total
Number
of Men
Attended

Total
Number
of Women
Attended

Meri Kahaani Meri Zubaani Beneficiaries

Overall

POSHAN

PMMVY

WCD
Total

1

A&N ISLANDS

66

10,812

4,576

6,220

418

41

25

66

2

ANDHRA PRADESH

8,383

2,959,847

1,455,372

1,493,667

40,648

2674

1679

4,353

3

ARUNACHAL PRADESH

1,015

111,782

59,210

52,156

17,948

170

256

426

4

ASSAM

2,173

2,676,773

1,060,651

1,614,079

38,112

8634

3432

12,066

5

BIHAR

5,419

2,452,734

1,358,912

1,086,541

29,916

118

571

689

6

CHHATTISGARH

4,267

3,209,722

1,479,365

1,701,791

115,719

4727

6488

11,215

7

DELHI

-

-

-

-

-

-

-

-

8

GOA

181

29,334

11,882

17,363

291

48

78

126

9

GUJARAT

12,833

5,087,709

2,878,934

2,193,906

72,624

8006

689

8,695

10

HARYANA

4,457

3,129,151

1,820,340

1,303,054

47,118

2613

2880

5,493

11

HIMACHAL PRADESH

3,534

286,277

124,238

158,716

7,881

176

561

737

12

JAMMU AND KASHMIR

4,197

2,906,671

1,671,234

1,228,461

87,557

2761

2764

5,525

13

JHARKHAND

2,665

975,990

451,697

520,364

19,515

138

609

747

14

KARNATAKA

3,546

913,663

501,786

408,995

4,831

17

35

52

15

KERALA

657

177,596

100,085

77,386

3,478

1

0

1

16

LADAKH

184

29,206

13,211

15,940

789

29

26

55

17

LAKSHADWEEP

10

14,437

7,801

6,612

13

1

0

1

18

MADHYA PRADESH

10,967

8,018,219

4,443,693

3,534,465

155,380

2847

4776

7,623

19

MAHARASHTRA

17,621

9,083,751

5,124,211

3,893,198

115,268

949

1262

2,211

20

MANIPUR

-

-

-

-

-

-

-

-

21

MEGHALAYA

1,108

78,798

29,401

48,965

2,768

125

23

148

22

MIZORAM

112

8,764

4,338

4,422

459

33

35

68

23

NAGALAND

377

31,067

15,349

15,702

1,815

32

96

128

24

ODISHA

5,275

1,794,800

763,246

1,026,928

11,592

435

61

496

25

PUDUCHERRY

72

36,219

13,032

22,615

14,935

292

451

743

26

PUNJAB

6,792

1,197,520

600,065

595,203

18,941

431

715

1,146

27

RAJASTHAN

5,773

7,465,509

3,990,904

3,433,415

336,300

11994

20569

32,563

28

SIKKIM

-

-

-

-

-

-

-

-

29

TAMIL NADU

4,900

863,684

356,580

506,910

9,065

217

8

225

30

TELANGANA

4,522

607,486

329,118

277,451

5,377

164

7

171

31

DNH & DND

38

34,820

15,783

19,032

286

18

11

29

32

TRIPURA

781

570,942

250,127

319,595

53,554

407

278

685

33

UTTAR PRADESH

39,895

27,783,894

15,304,019

12,401,227

239,237

5960

455

6,415

34

UTTARAKHAND

7,423

1,639,569

773,431

861,063

19,112

200

496

696

35

WEST BENGAL

-

-

-

-

-

-

-

-

 

TOTAL

159,243

84,186,746

45,012,591

38,845,442

1,470,947

54,258

49,336

103,594

विकसित भारत डॅशबोर्ड व्यतिरिक्त, ज्यामध्ये सध्या केवळ  महिला आणि बालविकास विभागाच्या  मेरी कहानी मेरी जुबानीआकडे प्रदर्शित केले आहेत, स्वतंत्र अंतर्गत अहवाल महिला आणि बालविकास मंत्रालयाद्वारे आयोजित केले  जाणारे इतर उपक्रम जसे की सुदृढ बालक स्पर्धा (SBS), ऑन-स्पॉट नोंदणी इत्यादींची नोंद ठेवतो.

आतापर्यंत सुदृढ बालक स्पर्धेच्या माध्यमातून निवडल्या गेलेल्या 1.07  लाख मुलांचा सत्कार आणि 1.38 लाख जणांनी ऑन स्पॉट नोंदणी केल्याची नोंद करण्यात आली आहे.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1993854) Visitor Counter : 166