संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

आधुनिक शिक्षण देत असताना सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी नव  भारतात आणखी गुरुकुलांची  आवश्यकता : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Posted On: 06 JAN 2024 2:46PM by PIB Mumbai

 

केवळ आधुनिक शिक्षण देण्यासाठीच नव्हे तर भारताच्या नैतिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन  करण्यासाठी देशात आणखी गुरुकुलांची स्थापना  करण्याचे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. 06 जानेवारी 2024 रोजी उत्तराखंड येथील हरिद्वार येथे स्वामी दर्शनानंद गुरुकुल महाविद्यालयात 'गुरुकुलम एवम आचार्यकुलम'ची पायाभरणी केल्यानंतर राजनाथ सिंह म्हणाले की, परकीय संस्कृतीच्या अनुकरणामुळे नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत असताना गुरुकुल संस्थांनी नैतिक मूल्यांचा समावेश करून तरुणांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी पुढे आले पाहिजे.

सुमारे 1,000-1,500 वर्षांपूर्वी या देशात अनेक मोठी विद्यापीठे होती, जिथे गुरुकुल परंपरा प्रचलित होती. त्यानंतरआपल्या देशाने परकीय आक्रमकांकडून  ती व्यवस्था जवळजवळ नष्ट करताना पाहिले. त्यानंतर परकीयांनी आणलेली शिक्षण प्रणाली देशाच्या सांस्कृतिक भावनेनुसार शिक्षण देत नव्हती.त्यांनी आपली भारतीय संस्कृती हीन म्हणून दाखवली. या भावनेचा परिणाम केवळ राजकीयच नाही तर मानसिकदृष्ट्याही झाला. त्या काळात स्वामी दर्शनानंदजींनी या गुरुकुलाची स्थापना केली  तेव्हापासून हे गुरुकुल आपल्या तरुण पिढ्यांना ज्ञान प्रदान करत आहे,” असे संरक्षण मंत्री म्हणाले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा संदर्भ देत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्राथमिक शिक्षणापासूनच तरुण प्रज्वलित मनांमध्ये नैतिक मूल्ये रुजवण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे सांगितले . नवीन शैक्षणिक धोरण देशभरातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये लागू केले जात आहे. शैक्षणिक व्यवस्थेत अचानक कोणताही बदल होत नाही तर  ही प्रक्रिया प्रदीर्घ असते. या दीर्घ प्रक्रियेत गुरुकुल खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात,” असेही ते म्हणाले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निदर्शनास आणून दिले की गुरुकुल हे केवळ प्राचीन शिक्षण पद्धतींचे पालन करतात असे समजले जाते, परंतु आजच्या काळात गुरुकुल प्रगती करत आहेत आणि ते आधुनिक बनत चालले आहेत.  गुरुकुल संस्थांनी आजच्या सतत विकसित होत असलेल्या काळाशी सुसंगत पारंपारिक शिक्षणासह कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञान यासारख्या उदयोन्मुख आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्याचे आवाहन यावेळी संरक्षण मंत्र्यांनी केले. अशा प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करा जे देशाला त्या क्षेत्रात अग्रेसर बनवेल. गुरुकुलांनी इतर शैक्षणिक संस्थांसाठी मार्गदर्शक म्हणून काम केले पाहिजे. येणाऱ्या काळात त्यांनी पुन्हा एकदा देशाचे आणि संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले पाहिजे आणि भारताची नवीन ओळख प्रस्थापित केली पाहिजे असेही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

देशातील सांस्कृतिक विकासात गुरुकुल संस्थांची भूमिकाही यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केली.

***

N.Chitale/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1993819) Visitor Counter : 142


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu